• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Business Idea: सुरू करा या प्रोडक्टचा व्यवसाय, घरबसल्या होईल 10 लाख रुपयांची कमाई

Business Idea: सुरू करा या प्रोडक्टचा व्यवसाय, घरबसल्या होईल 10 लाख रुपयांची कमाई

आजचे सुशिक्षित तरुणही शेतीकडे झपाट्याने वळत आहेत आणि महिन्याला लाखो रुपये सहज कमावतात. आम्ही तुम्हाला वांग्याच्या शेतीबद्दल (Brinjal Farming) सांगत आहोत.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर: आजकाल आर्थिक गरजा भागवण्यासाठी केवळ नोकरी करून भागत नाही. अनेकदा जोड व्यवसायाचीही (Start Your Own Business) गरज भासते. काही वेळा घरातील एखादी व्यक्ती नोकरी तर दुसरी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसू लागते. दरम्यान तुम्ही देखील अशाप्रकारे व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर एक बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्यवसायात थोडा संयम आवश्यक असतो, पण कमाईच्या दृष्टिकोनातून नोकरीपेक्षा जास्त कमाई होते. आजचे सुशिक्षित तरुणही शेतीकडे झपाट्याने वळत आहेत आणि महिन्याला लाखो रुपये सहज कमावतात. आम्ही तुम्हाला वांग्याच्या शेतीबद्दल  (Brinjal Farming) सांगत आहोत. यात अनेक प्रकार आहेत. विविधता आणि देखभाल यावर अवलंबून, ही पिके 8 महिने ते 12 महिने टिकू शकतात. वांग्याच्या लागवडीतून  (How to Start Brinjal Farming) तुम्ही भरपूर नफा मिळवू शकता, पण आधी तुमच्या भागात कोणती वांगी विकली जातात हे ठरवणे आवश्यक आहे. म्हणजे वांगी पिकवण्यापूर्वी बाजारात जाऊन काही संशोधन करा आणि मग मागणीनुसार वांग्याच्या त्या जातीची लागवड करा. हे वाचा-Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का? वांग्याच्या पीकाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे पीक खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेता येतं. वांग्याची मिश्र पीक म्हणून देखील लागवड केली जाते. वांग्याचे अधिक उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला बियाण्याची योग्य लागवड करावी. महत्त्वाचे म्हणजे लागवड करताना दोन झाडांमधील अंतराची काळजी घ्या. दोन झाडे आणि दोन रांगांमधील अंतर 60 सें.मी. असावे लागेल. बियाणे पेरण्यापूर्वी शेताची 4 ते 5 वेळा नांगरणी करुन घ्या. त्यानंतर शेतातील गरजेनुसार बेड तयार करावेत. वांग्याच्या लागवडीत एकरी 300 ते 400 ग्रॅम बियाणे वापरावे. पेरणीनंतर बिया 1 सेमी खोलीपर्यंत मातीने झाकल्या पाहिजेत. वांग्याचे पीक दोन महिन्यांत तयार होते. वांगी लागवडीमध्ये सिंचन वांग्याच्या लागवडीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी योग्य वेळी पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात दर 3-4 दिवसांनी पाणी द्यावे आणि हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे. धुक्याच्या दिवसात पिकाचे संरक्षण करण्यासाठी जमिनीतील ओलावा आणि पाणी नियमित ठेवा. वांगी पिकात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण वांगी पिक साचलेलं पाणी सहन करू शकत नाही. हे वाचा-SBI Fraud Alert: बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती कुणालाही सांगू नका; अन्यथा... काय आहे खर्च आणि कमाई? एक हेक्टर वांग्याच्या लागवडीसाठी पहिल्या काढणीपर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च येणार आहे. त्याच वेळी, वर्षभर देखभालीसाठी आणखी 2 लाख रुपये खर्च होऊ शकतात. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात वांग्याच्या लागवडीवर तुम्हाला सुमारे 4 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर एका वर्षात एक हेक्टर ते 100 टन वांग्याचे उत्पादन होऊ शकते. हे मिळालेलं उत्पादव सरासरी 10 रुपये किलो दराने जरी विकलं गेलं तरी किमान 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. म्हणजेच 4 लाख रुपये खर्च काढल्यास वांगी पिकातून वर्षभरात सुमारे 6 लाख रुपयांचा नफा मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: