Home /News /money /

Business Idea : घरबसल्या सुरु करा 'हा' सर्विस बिझनेस, लाखो रुपयांची होऊ शकते कमाई

Business Idea : घरबसल्या सुरु करा 'हा' सर्विस बिझनेस, लाखो रुपयांची होऊ शकते कमाई

ऑनलाइन होर्डिंग व्यवसाय (Online Hoardings Business), डिजीटल होर्डिंग व्‍यवसायच्‍या या युगात पैसे कमावण्याची मोठी संधी आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : चांगली नोकरी असेल तरी आपल्या स्वत:चा व्यवसाय (Starting own business) असावा असं प्रत्येकालाच वाटतं. जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय घरी बसून सुरू करायचा असेल तर तुम्हाला एका उत्तम बिझनेस आयडियाबद्दल (Profitable business idea) सांगत आहोत. तुम्ही फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करुन हा व्यवसाय सुरू करू शकता आणि करोडोंची कमाई (earn money) करू शकता. ऑनलाइन होर्डिंग व्यवसाय (Online Hoardings Business), डिजीटल होर्डिंग व्‍यवसायच्‍या या युगात पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. News18 ने Gohoardings.com या आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा (Deepti Awasthi Sharma) यांच्याशी बातचित केली. दीप्ती या व्यवसायातून दर महिन्याला 1 कोटींहून अधिकची कमाई करत आहे. तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय कसा सुरू करू शकता (How to start a hoarding business in India ) आणि त्यातून किती पैसे कमावता येतील. वर्षभरात करोडोंची कमाई दीप्ती अवस्थी शर्मा यांनी 2016 मध्ये जेव्हा ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्या केवळ 27 वर्षांच्या होत्या. जास्त पैसे नसल्यामुळे दीप्ती यांनी केवळ 50 हजार रुपये गुंतवून ऑनलाइन होर्डिंगचे काम सुरू केले. पुढच्याच वर्षापासून त्यांना 12 कोटींची कमाई सुरू झाली आणि एका वर्षानंतर दीप्ती यांच्या कंपनीची उलाढाल 20 पेक्षा जास्त झाली. दीप्ती सांगतात, मी 2016 मध्ये 50 हजारांच्या अगदी कमी रकमेतून डिजिटल होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. ही कल्पना यशस्वी झाली आणि अल्पावधीतच कमाई सुरू झाली. ATM मधून पैसे काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा पैसे अडकतील व्यवसाय कसा सुरू करायचा? मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम सुरू करता येईल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या डोमेन नावाने वेबसाइट तयार करावी लागेल. स्वतः त्याचा प्रचार करावा लागेल. सुरुवातीला, तुम्ही जाहिरात करण्यासाठी जागा शोधत असलेल्या लोकांशी कुठे आणि कसे संपर्क साधू शकता ते पाहू शकता. हा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. कारण दररोज लोकांना घरबसल्या जाहिरात करायची असते. Sovereign Gold Bond मधील गुंतवणूक कशी ठरते फायदेशीर, SBI ने सांगितली 6 कारणं जाणून घ्या ही कंपनी कशी काम करते? सर्वप्रथम, ग्राहकाला GoHoardings.com या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर, वेबसाइटवर जाऊन, तुमचे लोकेशन (जिथे त्याला होर्डिंग लावायचे आहे) शोधावे लागेल. लोकेशन निवडल्यानंतर, कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर साइट आणि लोकेशन उपलब्धतेची पुष्टी कंपनीकडून पाठवली जाते, त्यानंतर ग्राहकांकडून आर्टवर्क आणि ऑर्डर येतात. लोकेशन साइटवर थेट जाण्यासाठी आयडी आणि पासवर्ड दिला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की ही कंपनी एका महिन्याच्या कालावधीसाठी होर्डिंग लावण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये आकारते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Money

    पुढील बातम्या