मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea: SBI सोबत सुरु करा व्यवसाय; दरमाह घरबसल्या होईल मोठी कमाई

Business Idea: SBI सोबत सुरु करा व्यवसाय; दरमाह घरबसल्या होईल मोठी कमाई

Business Idea: टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम फ्रँचायझी सेट करण्याचा करार आहे. अशा परिस्थितीत एसबीआय एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला या कंपन्यांकडे अर्ज करावा लागेल.

    मुंबई, 31 जुलै : स्वत:चा व्यवसाय करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र एका चांगली बिझनेस आयडिया, भांडवल, जागा असे अनेक अडथळे असल्याने अनेकांचं व्यवसाय करण्याचं स्वप्न अपूरचं राहतं. मात्र जर तुम्हाला घरबसल्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही दरमहा 60,000-70,000 रुपये कमवू शकता. एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. बँक कधीही आपले एटीएम स्वत: सेट करत नाही. बँकेच्या वतीने काही कंपन्यांना एटीएम बसवण्याचे कंत्राट दिले जाते, त्या वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम बसवण्याचे काम करतात. एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगले पैसे कसे कमवू शकता. रेल्वेमध्ये लांबच्या प्रवासात विंडो सीटवर बसण्याचा अधिकार कुणाला असतो? नियम काय सांगतो तपासा टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम फ्रँचायझी सेट करण्याचा करार आहे. अशा परिस्थितीत एसबीआय एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला या कंपन्यांकडे अर्ज करावा लागेल. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता. एटीएम फ्रँचायझीसाठी आवश्यक नियम एटीएम सेट करण्यासाठी तुमच्याकडे 50-80 चौरस फूट जागा असावी. इतर एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. ही जागा अशा ठिकाणी असावी, जिथे लोक सहज पाहू शकतील. ITR Filing: इनकम टॅक भरण्याचा आज शेवटचा दिवस; डेडलाईन चुकल्यास जेलमध्येही जावं लागू शकतं 24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज जोडणीही आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमला काँक्रीटचे छत असणे आवश्यक आहे. V-SAT स्थापित करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइट >> Tata Indicash - www.indicash.co.in >> Muthoot ATM - www.muthootatm.com/suggest-atm.html >> India One ATM- india1atm.in/rent-your-space कमाई कशी होते? Tata Indicash ही SBI ATM ची सर्वात मोठी फ्रेंचायझिंग कंपनी आहे. ही कंपनी 2 लाखांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर एटीएम फ्रँचायझी देते. ही सुरक्षा ठेव परत मिळू शकते. याशिवाय 3 लाख रुपये खेळते भांडवल म्हणून जमा करावे लागतील. एकूण गुंतवणूक 5 लाख रुपये आहे. SBI ATM च्या फ्रँचायझीला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रुपये मिळतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, SBI, Small business

    पुढील बातम्या