मुंबई: रेडिमेड वस्तू खरेदी करण्याकडे सर्वांचा कल झपाट्याने वाढत आहे. रेडिमेड खाद्यपदार्थांनाची बरीच मागणी असते. आता तर बाजारात रेडिमेड भाज्याही उपलब्ध होत आहेत.
कांद्याची पेस्टही बाजारात रेडिमेड मिळते. अनेक कंपन्यांनी आता कांद्यावर प्रक्रिया करून त्याची पेस्ट बनवण्यास सुरुवात केली. या पेस्टला पसंती मिळत असून, तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच 17
खादी ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) कांद्याची पेस्ट बनवण्याच्या व्यवसायाचा एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार, कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे किमान 300 ते 500 चौरस फूट जागा हवी. कांद्याची पेस्ट बनवण्याचा कारखाना काढण्यासाठी एक लाख रुपये गुंतवून करून या मोकळ्या जागेवर शेड बनवावी लागेल. दुसरीकडे, पेस्ट तयार करण्यासाठी फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, लहान भांडी, मग, कप इत्यादी साहित्य घेण्यास सुमारे 1.75 लाख रुपये खर्च करावे लागतील.
हा व्यवसाय चालवण्यासाठी तुमच्याकडे 2.75 लाख रुपये असावे लागतील. कच्चा माल खरेदी, पॅकिंग, वाहतूक आणि कामगारांचे पगार इत्यादींवर हा खर्च होईल.
कर्ज मिळेल का?
कांद्याची पेस्ट बनवण्याच्या या युनिटमध्ये एका वर्षात सुमारे 193 क्विंटल कांद्यांची पेस्ट तयार होते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील, तर सरकार तुम्हाला यासाठी मदत करू शकेल. या व्यवसायासाठी तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता.
लाखो रुपयांची कमाई
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या रिपोर्टनुसार, तुम्ही पूर्ण क्षमतेनं कांद्याची पेस्ट तयार केली, तर तुम्ही एका वर्षात 7.50 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवू शकता. यातून सर्व खर्च वजा केल्यास 1.75 लाख रुपयांचा नफा तुम्हाला मिळू शकेल. तसंच या व्यवसायातला नफा तुमच्या मार्केटिंगवर अवलंबून असतो. होलसेल माल विकण्याऐवजी थेट ग्राहकांना किरकोळ विक्री करीत असाल तर तुम्हाला अधिक नफा होईल.
अलीकडच्या काळात कृषिपूरक उद्योग-व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत. ग्रामीण भागामध्ये राहूनही असे उद्योग सुरू करता येतात. तसंच असा व्यवसाय सुरू करण्यास सरकारदेखील मदत करत असल्यामुळे नव्याने रोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. कांद्याची पेस्ट तयार करण्याचा व्यवसाय त्यापैकीच एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Onion