Home /News /money /

बंपर फायद्याची Business Idea: 20 हजार गुंतवून होईल 4 लाखांपर्यंत कमाई

बंपर फायद्याची Business Idea: 20 हजार गुंतवून होईल 4 लाखांपर्यंत कमाई

सध्याच्या या परिस्थितीत शेती करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आम्ही सुचवत आहोत. ही अशा एका पिकाची शेती आहे, ज्यामधून वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.

मुंबई, 26 जानेवारी: कोरोना साथीच्या काळात (Coronavirus Pandemic) अनेकांचे रोजगार गेले. नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करण्याकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात नोकरीसाठी आलेले अनेक नागरिक गावी शेती-वाडी असेल तर तिकडे जाऊन शेती (business in Farming) करत आहेत. सध्याच्या या परिस्थितीत शेती करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आम्ही सुचवत आहोत. ही अशा एका पिकाची शेती आहे, ज्यामधून वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. ही शेती आहे लेमनग्रास अर्थात गवती चहाची (Lemongrass Farming Business). आजकाल अनेक औषधी वनस्पतींची शेती केली जाते. त्यापैकीच हे एक पीक आहे. याची व्यावसायिक मागणी वाढत असल्यानं यातून चांगला नफा मिळण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) आपल्या 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमात गवती चहाच्या शेतीचा आवर्जून उल्लेख केला होता. या शेतीतून शेतकरी स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतातच; पण देशाच्या प्रगतीतही हातभार लावू शकतात असं त्यांनी म्हटलं होतं. हे वाचा-अनेक IPO मुळे गेल्यावर्षी बंपर कमाई, मात्र यावर्षी 16 कंपन्यामुळे मोठं नुकसान लेमनग्रास अर्थात गवती चहा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकल्यावर काढा बनवण्यासाठी याचा आपण घरीदेखील मोठ्या प्रमाणात वापर करतो. यातल्या औषधी गुणधर्मामुळे यापासून काढलेल्या तेलालाही बाजारात मोठी मागणी आहे. हर्बल उत्पादनांमध्ये (Herbal Product) याचा वापर सातत्याने वाढत आहे. व्यावसायिक पातळीवर अनेक प्रकारची औषधं, सौंदर्यप्रसाधनं, साबण, तेल निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो. यामुळेच कंपन्या चांगली किंमत देऊन याची खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक नफा मिळतो. याच्या शेतीतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीक दुष्काळी भागातही चांगलं घेता येतं. ते वाढण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. एवढंच नाही, तर शेतात खत न घालताही चांगलं पीक घेता येतं. जनावरांना याच्या पानांची चव आवडत नाही. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता देखील कमी होते. फेब्रुवारी ते जुलै हा काळ याच्या लागवडीसाठी अनुकूल असतो. 3 ते 5 महिन्यांत हे पीक येतं. एकदा लागवड केल्यावर सहा ते सात वेळा कापणी करता येते. वर्षभरात तीन ते चार वेळा सहज कापणी करता येते. जमिनीपासून साधारण 5 इंच उंचावरून कापणी केली जाते. एक गुंठा जमिनीवरच्या पिकाद्वारे वर्षभरात 3 ते 5 लिटर तेल मिळू शकतं. हे तेल बाजारात प्रतिलिटर 1500 रुपये दरापर्यंत विकलं जातं. एकदा लागवड केलेल्या पिकातून तीन वर्षांपर्यंत तेल मिळतं. मार्च-एप्रिलमध्ये त्याची रोपवाटिकाही तयार करता येते. याच्या लागवडीसाठी साधारण वीस हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातून चार लाख रुपयांपर्यंतचा फायदा सहज मिळू शकतो. हे वाचा-शेअर बाजारातील घसरणीत नुकसान टाळायचंय? असा तयार करा पोर्टफोलियो नुकसान टळेल फायदेशीर शेतीसाठी हे एक उत्तम पीक आहे. त्यामुळे नोकरी नसेल आणि शेती करायची असेल तर गवती चहाची शेती करण्याचा मार्ग नक्कीच लाभदायी आहे
First published:

पुढील बातम्या