मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Business Idea: घरबसल्या सुरु करा व्यवसाय; गृहिणींसाठी तर बेस्ट बिझनेस, रिकाम्या वेळेत पैसे कमावण्याची संधी

Business Idea: घरबसल्या सुरु करा व्यवसाय; गृहिणींसाठी तर बेस्ट बिझनेस, रिकाम्या वेळेत पैसे कमावण्याची संधी

काळाच्या ओघात गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही याची सुरुवात 5000 ते 8000 रुपयांपासून करू शकता.

काळाच्या ओघात गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही याची सुरुवात 5000 ते 8000 रुपयांपासून करू शकता.

काळाच्या ओघात गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही याची सुरुवात 5000 ते 8000 रुपयांपासून करू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 17 ऑगस्ट : नोकरी करत असलेल्या व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की आपला काहीतरी व्यवसाय असावा. कारण कोरोना काळात नोकरी करणाऱ्यांच्या स्थितीचा अंदाज सर्वांनाच आला आहे. अनेकजण महामारीच्या काळात बेरोजगार झाले. त्यामुळेच छोटा-मोठा व्यवसाय गरजेचा आहे असं सर्वांनाच वाटतं. जर तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल जिथे कमी खर्च असेल आणि तुम्ही घरी बसून चांगले पैसे कमवू शकता. तर एका व्यवसायाबद्दल सांगत आहोत, घरातील महिलाही हा व्यवसाय करू शकतात. त्यांच्याकडे मोकळा वेळ असेल, तर वेळेचा योग्य वापर होईल आणि भरपूर पैसेही मिळतील. गिफ्ट बास्केट बनवण्याचा हा व्यवसाय आहे. जर तुम्हाला सजावटीचे काम करायला आवडत असेल तर तुम्ही या व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकता. आजच्या काळात लोकांना विशेष प्रसंगी गिफ्ट बास्केट खरेदी करायला आवडते. सहसा लोक यात फारशी सौदेबाजीही करत नाहीत. बाजारात गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतेक शहरी भागात वाढदिवस, वर्धापन दिन, लग्न समारंभ आणि इतर शुभ प्रसंगी गिफ्ट बास्केटची मागणी वाढत आहे. जाणून घ्या गिफ्ट बास्केटचा व्यवसाय काय आहे गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी टोपली कशी बनवली जाते. डिजिटल गोल्डचा आहे जमाना! या अ‍ॅपवर मिळत आहे बंपर कॅशबॅक, आजच खरेदी करा! ज्यामध्ये गिफ्ट चांगले पॅक करून दिले जाते, ही टोपली तुम्ही घरी बनवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या किमतीत गिफ्ट बास्केट तयार करू शकता. आजच्या काळात अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट बनवण्याचे काम सुरू केले आहे. 5000 रुपयात सुरु करा व्यवसाय काळाच्या ओघात गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही याची सुरुवात 5000 ते 8000 रुपयांपासून करू शकता. तुमचा व्यवसाय यशस्वी झाल्यात तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बास्केट किंवा बॉक्स रिबन लागेल. तर रॅपिंग पेपर, लोकल आर्ट, हस्तकला वस्तू, सजावटीचे साहित्य, ज्वेलरी पिस, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर्स, फॅब्रिकचे तुकडे, पातळ वायर, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गम आणि कलरिंग टेप इत्यादी सामान आवश्यक आहे.

मोबाइल हरवल्यास बँक खात्यातून पैसे जाण्याची भीती? घाबरू नका अशी करा UPI ​​पेमेंट बंद

मार्केटिंग कसे करणार? गिफ्ट बास्केटच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी, एक सॅम्पल गिफ्ट तयार करा आणि आपल्या जवळच्या बाजारपेठेतील मोठ्या दुकानदारांना सॅम्पल म्हणून दाखवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचे सॅम्पल ऑनलाइन वेबसाइटवर अपलोड करू शकता आणि गिफ्ट बास्केट ऑनलाइन विकू शकता. जर तुम्ही तुमच्या गिफ्ट बास्केटची किंमत थोडी कमी ठेवली तर ती सहज विकायला सुरुवात होईल.
First published:

Tags: Business, Money, Small business

पुढील बातम्या