Home /News /money /

Business Idea: वर्षभर करता येईल हा व्यवसाय, मोदी सरकारही करणार मदत

Business Idea: वर्षभर करता येईल हा व्यवसाय, मोदी सरकारही करणार मदत

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची समस्या लक्षात घेऊन सरकारने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतीशिवाय अन्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारकडे अनेक योजना आहेत.

नवी दिल्ली, 8 जानेवारी : सरकारतर्फे देशात व्यवसायांना चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे शेती आणि शेतकऱ्यांना विशेष दर्जा आहे. रात्रंदिवस शेतात राबून आपल्या कुटुंबासाठी आणि करोडो नागरिकांसाठी शेतकरी (Farmer) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि इतर अनेक पिकांचं उत्पादन घेतात. एवढं करूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती स्थिर नाही. यामागचं सर्वांत मोठं कारण हे आहे, की शेतकऱ्यांना घेतलेल्या पिकांमधून म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नाही. तसंच शेतीशिवाय त्यांच्याकडे उत्पन्नाचं इतर साधनही नसतं. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना कर्ज घ्यावं लागतं आणि दुसरी कामं करावी लागतात. यामुळे शेतकरी आत्महत्याही होतात. आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची समस्या लक्षात घेऊन सरकारने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना शेतीशिवाय अन्य रोजगाराच्या संधी (Employment Opportunities) उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारकडे अनेक योजना आहेत. जर तुम्हीही शेतकरी असाल आणि तुम्हालाही या योजनांच्या माध्यमातून चांगली कमाई करायची असेल तर हे वाचा. कारण या योजनांमधून तुम्हीही चांगला नफा मिळवू शकता.

तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा 'असा' करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये

आपल्याकडे पूर्वीपासून शेतीसोबत अनेक जोडव्यवसायदेखील केले जातात. त्यामध्ये कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मेंढीपालन, मधमाश्यापालन यांचा समावेश होतो. हे व्यवसाय हवामानावर आधारित नाहीत. त्यामुळे यातून वर्षभर उत्पन्नाची संधी असते. नवीन वर्षात यापैकीच एक असलेल्या मत्स्यपालनाशी निगडित काही प्रमुख योजना सरकारकडून राबवण्यात येतात. त्याबाबतची माहिती घ्या आणि लाभ घ्या.

या सरकारी योजनेद्वारे तुम्हीही बनू शकता लखपती, कमी पैशात होईल डबल फायदा

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) - प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तलाव, हॅचरी, फीडिंग मशीन आणि गुणवत्ता चाचणी तपासणीसाठी लॅबची सुविधा देण्यात येते. सोबतच मासे पाळण्याबद्दलची आणि त्यांच्या संरक्षणाबाबतची माहितीही देण्यात येते. शेतकऱ्यांना रिसर्क्युलेटरी अॅक्वाकल्चर (Recirculatory Aquaculture), बायोफ्लॉक, अॅक्वापॉनिक्स, फिश फीड मशीन, एअरकंडीशन गाडी आणि फिश कीपिंग दिलं जातं. तुम्हाला पिंजऱ्यातलं मत्स्यपालन, रंगीबेरंगी मत्स्यपालन करता येईल. तसंच प्रमोशन आणि ब्रँडिंगसारखे फायदेही योजनेअंतर्गत मिळतील. सरकारने देशामध्ये मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. याला नीलक्रांती असंही म्हटलं जात आहे. मत्स्य शेतकरी, मत्स्य विक्रेते, बचत गट, मत्स्य व्यापारी आणि शेतकरी या योजनांसाठी अर्ज करू शकतात.
First published:

Tags: Business, Money, Start business

पुढील बातम्या