1 जानेवारीपर्यंत 'हे' काम केलं नाही, तर तुम्हाला बँक खात्यातून काढता येणार नाही रक्कम

1 जानेवारीपर्यंत 'हे' काम केलं नाही, तर तुम्हाला बँक खात्यातून काढता येणार नाही रक्कम

Alert : तुमचं बँक खात्यासंदर्भातील (Bank Account) ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : तुमचं बँकेचं खातं (Bank Account)आयडीबीआय बँकमध्ये (IDBI Bank)आहे का ? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 जानेवारी 2020 पर्यंत IDBI Bank खात्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही पूर्ण केले नाही तर तुमचं खातं ठराविक काळासाठी गोठवलं (Partial Freeze)जाईल. यादरम्यान, तुम्हाला खात्यातून कोणत्याही प्रकारे पैशांचा व्यवहार तुम्ही करता येणार नाही.

करा हे महत्त्वपूर्ण काम?

IDBI Bankनं आपल्या ग्राहकांना आपली KYC कागदपत्रं जमा करण्यास सांगितलं आहे. एसएमएसच्या माध्यमातून IDBI Bank आपल्या ग्राहकांपर्यंत हा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं देखील आपल्या खातेदारांना केव्हायसी कागदपत्रांची पूर्तता करणं अनिवार्य केलं आहे.

KYC कागदपत्रांची तातडीनं करा पूर्तता

KYC डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी IDBI बँक आपल्या प्रत्येक ग्राहकाला SMS पाठवत आहे. या SMS मध्ये RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या खात्यात KYC कागदपत्रे अद्ययावत केली जावीत, असं सांगण्यात आलं आहे. KYC कागदपत्रं आपल्या जवळील IDBI बँकेच्या शाखेत किंवा होम ब्रांचमध्ये जाऊन जमा करण्याची ग्राहकांना सूचना देण्यात आली आहे.

(वाचा : IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण)  

1 जानेवारीनंतर तुमचं खातं गोठ

ग्राहकांनी लवकरात लवकर KYC अपडेट करून घ्यावे, असं बँकनं स्पष्ट आदेश दिले आहेत. हे काम तुम्ही तातडीनं केलं नाही तर 1 जानेवारी 2020 नंतर तुमचे बँक खातं काही काळासाठी गोठवलं जाईल. यानंतर तुम्हाला पैसे जमा करणं तसंच पैसे खात्यातून काढणं शक्य होणार नाही.

(वाचा : 'या' करन्सी करतात जागतिक आर्थिक बाजारपेठेवर राज्य!)

KYC म्हणजे काय?

KYC म्हणजे(Know Your Customer)सोप्या भाषेत सांगायचे झालं तर ग्राहकांविषयीच्या संपूर्ण माहितीची प्रक्रिया असते. KYC करणं सर्वांसाठी आवश्यक आहे. KYC विना कोणत्याही प्रकारची गुंतवणूकदेखील शक्य नाही. एखादा ग्राहक बँकेच्या सोयीसुविधांचा दुरुपयोग तर करत नाही ना? हे KYCच्या माध्यमातून सुनिश्चित केलं जातं. भलेही KYC अर्जाची तुम्ही ऑनलाइन पूर्तता केली तरीही कागदपत्रं आणि फोटोच्या पडताळणीसाठी बँकेमध्ये जाणं आवश्यकत आहे.

(वाचा :  जिओचा मोठा निर्णय! ठराविक आउटगोइंग कॉल्ससाठी आता मोजावे लागतील पैसे)

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

Published by: Manoj Khandekar
First published: October 9, 2019, 9:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading