पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी Good News, आता रांग लावून नाही तर घरी बसल्याच करा पैशांचा व्यवहार

पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी Good News, आता रांग लावून नाही तर घरी बसल्याच करा पैशांचा व्यवहार

पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्टनं पोस्ट ऑफिस बचत खातेदारांसाठी मोबाइल बँकिंग सर्व्हिस (Mobile Banking Services) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिसनं परिपत्रक जारी करत या नवीन सुविधेसंदर्भात घोषणा केली. यानुसार सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये बचत खातेदारांसाठी ही सुविधा 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) बचत खातेदार मोबाइल बँकिंग सुविधेचा फार आधीपासूनच लाभ घेत आहेत. या सुविधेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग्स स्कीमसारख्या टाइम डिपॉझिट, किसान विकास पत्र, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट इत्यादी बाबींची व्यवस्थापन करणं सोपे होणार आहे.

(वाचा : Parle G : 2 महिन्यांपूर्वी 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात, आता 55 कोटींनी वाढला नफा)

कशी कराल नोंदणी?

'इकोनॉमिक्स टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंटसाठी मोबाइल बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी खातेदाराला पोस्ट ऑफिस सेविंग्स बँक ATM/ इंटरनेट/ मोबाइल बँकिंगसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्यानं KYC ची पूर्तता करावी लागणार आहे.

(वाचा : दिवाळीच्या आधी आहे बँकांचा संप, पूर्ण करून घ्या राहिलेली कामं)

या बाबींची करावी पूर्तता

1. सर्वात आधी ग्राहकांजवळ CBS पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट असणं आवश्यक आहे.

2. ग्राहकांजवळ नेट बँकिंग असणं आवश्यक आहे. ही सुविधा उपलब्ध नसल्यास CIF असणं आवश्यक आहे.

3. स्वतःच्या नावावर असलेलं खातं किंवा संयुक्त खातंच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

(वाचा : तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना?)

'या' हॉटेलमध्ये वेटर नाही तर चक्क रोबो देतोय जेवण, पाहा VIDEO

First published: October 17, 2019, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading