सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, महिन्याभरात एवढं स्वस्त झालंय सोनं

सोनं तसंच सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : सोनं तसंच सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठीक दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं घसरण पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे.  गेल्या आठवड्यातही सोन्याचे भाव घसरले होते.

शुक्रवारी दिवसाअंती असलेल्या सोन्याच्या किमती

1. MCX - गोल्ड फ्युचर (Gold Future Rate),प्रति 10 ग्रॅम 106 रुपयांनी स्वस्त

किंमत - 38,090 रुपये

MCX - चांदीची किंमत 45,500 रुपये

(वाचा : मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी; अंर्तवस्त्रांमध्ये लपवले एक कोटीचे सोनं!)

गेल्या एक महिन्यात सोनं 1,900 रुपयांनी स्वस्त

गेल्या महिन्यात प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव जवळपास 40 हजार रुपये होते. तर या महिन्यांत सोन्याच्या दरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 1,900 रुपयांची घट झाली आहे. यामुळे आता धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोन्याच्या होणाऱ्या किरकोळ खरेदीत तेजी पाहायला मिळेल,अशी ज्वेलर्संना अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ज्वेलर्सकडून सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना ऑफर देण्यात आल्या आहेत.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या आधी ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

VIDEO : गर्दीने गजबजलेल्या ठाण्यात माणुसकीचं दर्शन, एका मुक्या जिवाची सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 08:14 PM IST

ताज्या बातम्या