अमेरिकन कंपनी भारतात उघडणार 600 रेस्टाॅरंट्स, 'इतक्या' नोकऱ्या होणार उपलब्ध

अमेरिकन कंपनी भारतात उघडणार  600 रेस्टाॅरंट्स, 'इतक्या' नोकऱ्या होणार उपलब्ध

अमेरिकन फास्ट फूड कंपनी यम ब्रँड भारतात टॅको बेलचे 600 आऊटलेट उघडण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : अमेरिकन फास्ट फूड कंपनी यम ब्रँड भारतात टॅको बेलचे 600 आऊटलेट उघडण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतात कारभार करण्यासाठी टॅको बेलनं बर्मन हाॅस्पिटॅलिटीसोबत करार केलाय.या कराराप्रमाणे भारतात 600 रेस्टाॅरन्ट उघडले जाणार आहेत. त्यामुळे 20 हजार नव्या नोकऱ्या मिळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. डाबर इंडियाचे प्रमोटर्स बर्मन कुटुंबीय आहेत.

आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्

10 वर्षात उघडतील 600 रेस्टाॅरन्ट - टॅको बेलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष लिज विलियमचं म्हणणं आहे की त्यांनी बर्मन हाॅस्पिटॅलिटीसोबत एक मास्टर फ्रँचाइजी अॅग्रीमेंटवर साइन केलीय. त्यानुसार आम्ही इथे 10 वर्षांत 600 रेस्टाॅरंट उघडणार आहे.

अमेरिकेत टॅको बेलची 7 हजार रेस्टाॅरन्ट आहेत.  जगातल्या इतर देशांमध्ये याची 500 रेस्टाॅरन्ट आहेत.

घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये

2010मध्ये टॅको बेलनं सर्वात पहिल्यांदा भारतात प्रवेश केला. इथे आपली रेस्टाॅरंट्स सुरू केली. बर्मन हाॅस्पिटॅलिटीचे अध्यक्ष गौरव बर्मन यांचं म्हणणं आहे की एक रेस्टाॅरंट उघडण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च येतो.

यामुळे इथे रोजगार वाढेल. बर्मन हाॅस्पिटॅलिटीमध्ये रेस्टाॅरंट आणि स्टोअर्समधल्या पदांसाठी 20 हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळेल.

रेल्वेनं प्रवास करत असताना तुम्ही उतरण्याआधी तुम्हाला येईल 'हा' मेसेज

ते म्हणाले, आम्ही आयटी, अर्थ, सप्लाई चेन यात लोकांना नोकऱ्या देऊ.

टॅको बेल तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. या रेस्टाॅरन्टसमध्ये मॅक्सिकन फास्ट फूड मिळतं. इथे बराच काळ रेंगाळत राहता येतं. त्यामुळे तरुणांना जिभेचे चोचले पुरवणं आणि बऱ्याच काळ मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यासाठीचं चागलं ठिकाण आहे. कॅलिफोर्नियामध्ये याचं मुख्य आॅफिस आहे.

पार्थ पवार आणि नितेश राणे एकाच गाडीत, पाहा हा VIDEO

First published: May 16, 2019, 4:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading