Burger King Listing: 92 टक्के प्रीमियम दराने बर्गर किंग शेयर्सचं लिस्टिंग; गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा

Burger King Listing: 92 टक्के प्रीमियम दराने बर्गर किंग शेयर्सचं लिस्टिंग; गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा

810 कोटी रुपयांच्या बर्गर किंगच्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. बर्गर किंग 100 टक्के सब्सक्राईब होणारा या वर्षातील चौथा आयपीओ आहे.

  • Share this:

मुबंई, 14 डिसेंबर : सोमवारी बर्गर किंगचे (Burger King) शेयर्स 92 टक्के प्रीमियम दराने लिस्ट झाले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) बर्गर किंगची शेयर प्राईज (Burger King Share Price) 115.35 रुपये प्रति शेयर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 112.50 रुपये इतकी आहे. BSE वर 92.25 टक्के आणि NSE वर 87.5 टक्के प्रीमियम दराने बर्गर किंग शेयर्स लिस्ट झाले आहेत.

810 कोटी रुपयांच्या बर्गर किंगच्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणूकदारांसाठी या आयपीओचं सब्सक्रिप्सशन 2 डिसेंबरपर्यंत 59-60 रुपये प्रति शेयरवर खुलं होतं. गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे याला 156 टक्के सब्सक्राईब करण्यात आलं आहे.

बर्गर किंग 100 टक्के सब्सक्राईब होणारा या वर्षातील चौथा आयपीओ -

क्वॉलिफाईड इन्वेस्टर्ससाठी (QIBs) निश्चित केलेल्या शेयर्सला 86.64 टक्के सब्सक्राईब केलं गेलं. तसंच संस्थात्मक नसलेल्या गुंतवणूकदारांनी 354.11 टक्के आणि रिटेल गुंतवणूकदारांनी (Retail Investors) 68.15 टक्के सब्सक्राईब केलं. या वर्षात 100 टक्क्यांहून अधिक सब्सक्राईब होणारा हा चौथा IPO आहे. यापूर्वी Mazagon Dock Shipbuilders ला 157.41 टक्के, Happiest Minds ला 156.65 टक्के आणि Chemcon Speciality ला 149.3 टक्के सब्सक्राईब करण्यात आलं होतं.

(वाचा - कोरोनामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास समस्या? RBI अशी करेल मदत)

देशभरात 268 स्टोर्स ऑपरेट करतो बर्गर किंग -

या IPO मध्ये 450 कोटी रुपयांचं मूल्य असलेले शेयर्स सामिल आहेत. बर्गर किंग इंडियाने एंजल इन्वेस्टर्सद्वारे (Angel Investors) 364.5 कोटी रुपये जमवले हेत. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, CLSA इंडिया, ऐडलवाईज फायनेंशियल सर्विसेज, जेएम फायनेंशियल या ऑफरचे मॅनेजर्स आहेत. सध्या या क्विक सर्व्हिस रेस्टोरंट चेनकडे (QSR) एकूण 268 स्टोर्स आहेत. त्यापैकी 8 फ्रेंचाइजीचे स्टोर्स आहेत. त्यापैकी अधिकतर एयरपोर्ट्सवर आहेत. तर इतर स्टोर्सचे मालकी हक्क कंपनीकडे आहेत.

(वाचा - खूशखबर! डिसेंबरपर्यंत EPF वर मिळेल 8.50 टक्के व्याज; 6 कोटी लोकांना होणार फायदा)

Mrs Bectors आयपीओ -

बर्गर किंग दरम्यान, आता दुसऱ्या आयपीओची संधी आहे. ब्रेड आणि बिस्किट बनवणारी कंपनी Mrs Bectors चा आयपीओ 15 डिसेंबर रोजी सब्सक्रिप्सशनसाठी खुला होणार आहे. तीन दिवसांनंतर 17 डिसेंबर रोजी याचं सब्सक्रिप्सशन बंद होईल.

Published by: Karishma Bhurke
First published: December 14, 2020, 3:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या