मुंबई, 27 जानेवारी: मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एका योजनेचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. नवीन वर्ष सुरू झाले आहे, आणि शेतकरी आता त्यांच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण मोठ्या शेतकऱ्यांसाठीही एक मोठी आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये, सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकते. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, वार्षिक मदतीची रक्कम चार हप्त्यांमध्ये 8,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
सध्या पीएम शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. म्हणजे तीन हप्त्यांच्या हिशोबाने 2000 रुपये. मात्र आता त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी 13वा हप्ता येणार आहे, ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत, तर जाणून घेऊया हा हप्ता कधी येईल.
Budget 2023: बजेटचे डॉक्यूमेंट ऑनलाइन पाहायचेय? ही आहे प्रोसेस
केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता लवकरच जारी करेल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. योजनेचा एक भाग म्हणून, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपयांचे उत्पन्न समर्थन प्रदान केले जाते. संपूर्ण मदत थेट या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. रिपोर्टनुसार, 13 वा हप्ता जानेवारीच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे परंतु अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस
13व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना केवायसीशिवाय पैसे मिळणार नाहीत. यासाठी शेतकरी कृषी विभागात ऑनलाइन eKYC करू शकतात. यासोबत किसान आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स काळजीपूर्वक भरा. नाव आणि पत्ता लिहिण्यात छोटीशी चूकही करू नका.
-पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
- पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
-पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401
- पीएम किसान नवीन हेल्पलाइन: 011-24300606
-पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
-ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.i
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, PM Kisan, Union budget