Home /News /money /

Budget 2022: पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणणार का? बजेटमध्ये घोषणा होणार?

Budget 2022: पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणणार का? बजेटमध्ये घोषणा होणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये त्यावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कातील ही कपात महामारीपूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूपच कमी असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) आज 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी (FY23) केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात (Budget 2022) अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल डिझेल बाबत काही घोषणा करणार का हे देखील पाहावं लागेल. कारण महागाई सध्याचा मोठा प्रश्न आहे. अशात पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात आल्या तर इतर गोष्टींवरही त्याचा परिणाम होतो. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत (Petrol Diesel under GST) आणले जाते किंवा उत्पादन शुल्क (Excise Duty) पूर्ववत केले जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळू शकेल. उत्पादन शुल्क पूर्ववत करण्याची मागणी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये त्यावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कातील ही कपात महामारीपूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूपच कमी असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत सरकारने उत्पादन शुल्क पुन्हा बहाल करावे, असे त्यांचे मत आहे. जेणेकरुन त्याचा अर्थव्यवस्थेला हातभार मिळेल. Budget 2022: शेअर बाजारची आजची हालचाल कशी असेल? गेल्या काही वर्षात या दिवशी नेमकं काय घडलं? उत्पादन शुल्क महसूल वाढवण्यास मदत करते 2020 मध्ये, केंद्राने कोरोना संकटाच्या काळात आपली तिजोरी वाढवण्यासाठी उत्पादन शुल्काच्या रूपात एक चांगला मार्ग शोधला. त्यामुळे महसूल वाढला पण तेल महाग झाले. नोव्हेंबर 2021 च्या सुरूवातीला उत्पादन शुल्कात केलेली कपात ही फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आलेल्या वाढीच्या केवळ 15-30 टक्के होती. सध्या उत्पादन शुल्क एकूण पंपाच्या किमतीच्या एक चतुर्थांश आहे. Union Budget 2022: अर्थमंत्री आज सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, या आहेत जनतेच्या 5 मोठ्या आशा भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, इतर महसुलातील तूट, जी 2020-21 मध्ये जवळजवळ भरून काढली गेली आहे, ती आता आगामी अर्थसंकल्पासाठी मोठी डोकेदुखी नाही कारण अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे अबकारी दरात आणखी कपात करण्यासाठी जागा निर्माण केली जात आहे. आगामी आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम निर्णय असला तरी अर्थसंकल्पात उत्पादन शुल्कात कपात होण्याची शक्यता नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Finance, Money, Nirmala Sitharaman, Petrol and diesel, Petrol and diesel price, Union budget

    पुढील बातम्या