Home /News /money /

Budget 2022: अर्थमंत्री ऐकणार का तुमची 'मन की बात'? Work From Home करणाऱ्यांना मिळणार का कर सवलत?

Budget 2022: अर्थमंत्री ऐकणार का तुमची 'मन की बात'? Work From Home करणाऱ्यांना मिळणार का कर सवलत?

महागाई (Inflation) वाढल्याने आणि सरासरी दरडोई (Per Head Income) उत्पन्न घटत असताना, पगारदार वर्गाला अर्थसंकल्पात काही दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) त्यांच्या अपेक्षांकडे लक्ष देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 29 जानेवारी: जगभरात गेल्या दोन वर्षांपासून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीनं (Coronavirus Pandemic) अनेक बदल घडवले आहेत. उद्योगधंदे, व्यापार, शाळा, कामकाज सगळ्याच्या पद्धती बदलून गेल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक कार्यक्षेत्रात कर्मचार्‍यांनी घरातून काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम-होम (WFH) संस्कृती आता चांगलीच रुजली आहे. आता 'न्यू नॉर्मल'शी (New Normal in coronavirus Pandemic) सगळेजण जुळवून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर, घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खर्चाचा बोजा वाढल्यानं कर सवलतीची (Tax Benefit) मर्यादा वाढवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महागाई (Inflation) वाढल्याने आणि सरासरी दरडोई (Per Head Income) उत्पन्न घटत असताना, पगारदार वर्गाला अर्थसंकल्पात काही दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) त्यांच्या अपेक्षांकडे लक्ष देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हे वाचा-आयकर भरण्याची शेवटची तारीख काय आहे? उशीर केला तर जेलही होऊ शकते वर्क फ्रॉम-होम पद्धतीमुळे (WFH) कर्मचाऱ्यांचा मोबाइल फोन, फर्निचर, वीज आणि इंटरनेट इत्यादी खर्च वाढले आहेत. याआधी ऑफिसमध्ये जाऊन काम करत असल्यानं या खर्चाचा बोजा त्यांच्यावर पडत नव्हता. कंपनी या सर्व सुविधा उपलब्ध करत असे. मात्र आता कर्मचार्‍यांना स्वतःच्या खिशातून हे सर्व खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे या खर्चाचा विचार करून डिडक्शनची मर्यादा वाढवल्यास किंवा हा खर्च करमुक्त केल्यास कर्मचाऱ्यांची ‘टेक होम सॅलरी’ म्हणजे प्रत्यक्षात हातात पडणारे वेतन वाढेल आणि याचा परिणाम वस्तू आणि सेवांची मागणी वाढण्यात होईल,' असं मत क्लिअरटॅक्सचे (ClearTax) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)अर्चित गुप्ता यांनी व्यक्त केलं. वर्क फ्रॉम-होम भत्ता कर्मचार्‍यांना वेठीस धरणारे हे नवीन खर्च पाहता, इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं (ICAI) केंद्र सरकारला घरातून कामाच्या खर्चावर काही कर सूट देण्याची सूचना केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी घरात कामकाजासाठी योग्य सोयीसुविधा म्हणजे फर्निचर, इंटरनेट सेवा आदी विविध सोयी करून घ्याव्या लागल्या. त्यासाठी आणि इतर खर्चासाठी विशेष सूट दिली जावी, अशी शिफारस प्री-बजेट सूचनांमध्ये केल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. संस्थेच्या मते, डेस्क, खुर्च्या आणि इतर बाबींवरील खर्च लक्षात घेऊन कर सवलत वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाचा-Budget 2022: स्वस्त होणार LIC Premiums? विम्यावर मिळणार आणखी कर सवलत? भत्ते किंवा खर्चाची भरपाई वाढवणं कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीमुळे वैद्यकीय खर्च (Medical Expenses) वाढला आहे, त्यात घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे फर्निचर, वीज, इंटरनेट इत्यादींच्या खर्चामुळे घरगुती खर्चात चांगलीच वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन, स्टडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 वरून 75,000 रुपये करावी अशी मागणी होत आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात (पीएफ) योगदानावर वजावट भविष्य निर्वाह अर्थात पीएफ खात्यांमधील अतिरिक्त योगदान आणि जमा झालेले व्याज कर कक्षेत आणण्यात आलं आहे. मात्र कर्मचार्‍यांचे पीएफ योगदान हे प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाख रुपयांच्या सवलतीत गृहीत धरलं जातं. ते आता स्वतंत्रपणे प्रदान करणं आवश्यक आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. हे वाचा-Budget 2022: 1950 सालामध्ये इतकाच होता Income Tax, आता कितीपर्यंत वाढला आहे? यामुळे होणाऱ्या वाढत्या घरगुती बचतीचा फायदा केवळ लोकांनाच नाही, तर सरकारलाही होतो. याद्वारे सरकारला स्वस्त, दीर्घकालीन निधीचा स्रोत उपलब्ध होतो. Fi-Neo-बँकेचे सह-संस्थापक सुजित नारायणन म्हणाले, ' बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या कर वजावटीसाठीची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून वाढवली पाहिजे. याशिवाय, यात कर बचतीसाठी केल्या जाणाऱ्या पाच वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींचा (Fixed Deposit) कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करावा. यामुळे गुंतवणुकीचा हा पर्याय अधिक आकर्षक होईल आणि अधिकाधिक लोक याचा फायदा घेतील.'
First published:

Tags: Budget, Nirmala Sitharaman, Union budget, Work from home

पुढील बातम्या