Home /News /money /

Budget 2022: शेअर बाजारची आजची हालचाल कशी असेल? गेल्या काही वर्षात या दिवशी नेमकं काय घडलं?

Budget 2022: शेअर बाजारची आजची हालचाल कशी असेल? गेल्या काही वर्षात या दिवशी नेमकं काय घडलं?

काल सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 285.94 अंकांची वाढ दिसून आली.

    मुंबई, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) आज सकाळी 11 वाजता 2022 चा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार आर्थिक विकासाला (Financial Growth) चालना देण्यासाठी काही मोठ्या घोषणा करू शकते. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळतात. या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प, मायक्रो डेटा आणि RBI चे धोरण पाहूनच बाजाराची वाटचाल ठरवली जाईल, असे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. गुंतवणूकदारांची संपूर्ण नजर बजेट आणि RBI च्या धोरणावर आहे. आर्थिक सर्वेक्षणात 8 टक्के जीडीपी वाढीचा दावा सोमवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2022-23 (Economic Survey 2022-23 ) सादर करण्यात आले. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2022-23 मध्ये 8 टक्के ते 8.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) काही महिन्यांपूर्वी एनएसएसओने दिलेल्या 9.2 अंदाजाच्या तुलनेत हा अंदाज विकास दरातील घट आहे. बजेटच्या दिवशी फोकसमधील स्टॉक्स, बंपर कमाई करु शकतात 'हे' शेअर; चेक करा लिस्ट शेअर बाजारात सोमवारचा दिवस कसा होता? फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) बद्दल बोलायचे तर बाजाराचे लक्ष यावरही असेल. गुंतवणुकीव्यतिरिक्त जागतिक ट्रेंडवरही लक्ष ठेवले जाईल. अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी दाखवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूतीसह बंद झाले. सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 285.94 अंकांची वाढ दिसून आली. 10 पैकी 6 वेळा सेन्सेक्स लाल चिन्हावर गेल्या 10 वर्षांत, अशी 4 वर्षे होती जेव्हा अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला. 2011, 2015, 2017 आणि 2019 या वर्षांमध्ये सेन्सेक्स अनुक्रमे 0.69 टक्के, 0.48 टक्के, 1.75 टक्के आणि 0.58 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याच वेळी, 2012 आणि 2013 मध्ये अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक घसरला होता. त्याचप्रमाणे, 2014, 2016 आणि 2018 मध्ये त्यात अनुक्रमे 0.28 टक्के, 0.66 टक्के आणि 0.16 टक्के घट झाली होती. Union Budget 2022: अर्थमंत्री आज सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, या आहेत जनतेच्या 5 मोठ्या आशा गेल्या वर्षी 2021 मध्ये बाजार कसा होता? गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी वाढ 2021 च्या अर्थसंकल्पात दिसून आली. 2021 मध्ये निफ्टी सुमारे 5 टक्के वर चढला होता. अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा गुंतवणूकदारांना नक्कीच आवडल्या होत्या. पण त्याच्या एक वर्ष आधी, म्हणजे 2020 च्या बजेटच्या दिवशी निफ्टीत 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली होती.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Share market, Union budget

    पुढील बातम्या