Home /News /money /

Budget 2022 : पुढील तीन वर्षात 400 ;वंदे भारत रेल्वे' सुरु करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget 2022 : पुढील तीन वर्षात 400 ;वंदे भारत रेल्वे' सुरु करणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

देशभरात रेल्वेचा जाळं आणि मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

    नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन चौथ्यांना अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. देशभरात रेल्वेचा जाळं आणि मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. वन स्टेशन वन प्रोडक्ट (One Station One Product) योजना आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार आहेत. शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. हॉस्पिटलिटी उद्योगांना कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.  130 लाख  सूक्ष्म  उद्योगांना मदतीचं काम केलं आहे. कोरोना संकटांना उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. उद्याोना यातून सावरण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची गॅरंटी देण्यात येणार आहे. सहा हजार कोटींचा कार्यक्रम सूक्ष्म आणि लघू उद्योगाच्या विकासासाठी राबवला जाणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Railway, Union budget

    पुढील बातम्या