Home /News /money /

Budget 2022 : अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदारांनी सावध राहावं, काय आहे तज्ज्ञांचं मत?

Budget 2022 : अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदारांनी सावध राहावं, काय आहे तज्ज्ञांचं मत?

आठवड्याच्या घसरणीपूर्वी बाजाराने चांगली तेजी दाखवली होती. तेव्हा तज्ज्ञ याला प्री-बजेट रॅली म्हणत होते. या घसरणीनंतर, अनेक गुंतवणूकदारांनी विचार करायला सुरुवात केली आहे की बाजारातील प्री-बजेट रॅली संपली आहे. पण, या विचारामागे कोणताही ठोस आधार नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जानेवारी : शेअर बाजारात (Share Market Update) सुरु असलेल्या घसरगुंडीमुळे गुंतवणूकदार (Investors) काही प्रमाणात चिंतेत आहेत. शुक्रवारी (आज) या आठवड्याचा चौथा दिवस असताना बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे. मंगळवार ते गुरुवारपर्यंत बाजारात मोठी घसरण दिसून आली. या तीन दिवसांत Sensex 1800 अंकांनी घसरला आहे. Nifty 50 च्या बाबतीतही हीच स्थिती आहे. शुक्रवारी बाजार उघडला तेव्हा मोठी घसरण झाली. 11:15 वाजता सेन्सेक्स 500 अंकांनी खाली आला होता. निफ्टी 50 देखील 150 अंकांनी कमजोर होता. सध्याच्या अस्थिरतेच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावलं याबाबत माहिती घेऊयात. तज्ज्ञ आता गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार असाल तर तुम्ही एकाच वेळी मोठी गुंतवणूक करणे टाळावे. तसेच, पॅनिक विक्री (Panic Sale) देखील टाळली पाहिजे. शेअर बाजारात दोन-तीन दिवस घसरण सुरू असताना अनेक किरकोळ गुंतवणूकदार घाबरतात. मग ते त्यांचे शेअर्स विकायला लागतात. तुम्ही बाजारात दीर्घ किंवा मध्यम मुदतीसाठी पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला पॅनिक सेलिंग करण्याची गरज नाही. ICICI बँकेने बदलले एफडीचे व्याजदर, कोणत्या योजनेचे व्याजदर किती? या आठवड्याच्या घसरणीपूर्वी बाजाराने चांगली तेजी दाखवली होती. तेव्हा तज्ज्ञ याला प्री-बजेट रॅली म्हणत होते. या घसरणीनंतर, अनेक गुंतवणूकदारांनी विचार करायला सुरुवात केली आहे की बाजारातील प्री-बजेट रॅली संपली आहे. पण, या विचारामागे कोणताही ठोस आधार नाही. त्यामुळे अशा अनुमानाऐवजी तुम्ही तुमचा संयम ठेवावा. बजेटला अजून आठवडा बाकी आहे. फक्त 3-4 दिवसांच्या घसरणीने घाबरणे ठीक नाही. Tips2Trades चे सह-संस्थापक आणि ट्रेनर ए.आर. रामचंद्रन यांनी बिझनेस इनसाइडरला सांगितले, गुंतवणूकदारांना या वर्षीचे बजेट चांगले असण्याची अपेक्षा आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नायती यांनाही असेच वाटते. बाजाराला रिफॉर्मिस्ट आणि प्रो ग्रोथ बजेटची गरज आहे, असं त्यांनी मिंट या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी;हे शुल्क देखील आहे माफ गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाले होते. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शेअर बाजाराला खूप आवडला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 2314 अंकांनी वर चढला आणि 48,600 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 देखील 646 अंकांच्या वाढीसह 14,281 अंकांवर बंद झाला. यावेळीही शेअर बाजाराला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Share market, Union budget

    पुढील बातम्या