Budget 2021: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल?

Budget 2021: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल?

मोदी सरकारच्या या सर्वांत आव्हानात्मक अर्थसंकल्पाकडून (Budget 2021)सर्वसामान्य मध्यमवर्गाचं दोनच गोष्टींवर लक्ष आहे. एक रोजगार संधींना चालना देणारे काही निर्णय घेणार का आणि आयकरात (Income Tax)काही बदल होणार का?

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: विकासदर निचांकी पातळीवर पोहोचलेला असताना, कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus pandemic)जागतिक अर्थव्यवस्थाच धोक्यात आलेली असताना आणि भारतापुढची आर्थिक आव्हानं वाढलेली असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचं तिसरा अर्थसंकल्प (Budget 2021)मांडत आहेत. यामधून सर्वसामान्यांना दोन गोष्टींची अपेक्षा होती. एक रोजगार संधींना चालना देणारे काही निर्णय घेणार का आणि आयकरात (Income Tax)काही बदल होणार का?

2019 च्या बजेटमध्ये मोदी सरकारने इन्कम टॅक्समधून सूट मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ केली होती. 5 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होतं. गेल्या वर्षीसुद्धा एवढीच करमुक्ती होती.

स्टँडर्ड डिडक्शनसुद्धा त्याच वर्षी वाढवून 50 हजार करण्यात आलं होतं. त्यानंतर हा आकडा बदलेला नाही. या वर्षी अर्थमंत्री करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणि स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम बदलण्याचे संकेत आहेत.

First published: February 1, 2021, 11:28 AM IST

ताज्या बातम्या