नवी दिल्ली, 30 जानेवारी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2021 रोजी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीमुळे (Corovirus Pandemic) गेल्या वर्षी देशाला मोठा आर्थिक फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो पण यामधील काही शब्द सामान्यांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्वाच्या शब्दांचा अर्थ
रेपो रेट (Repo Rate)
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात.
किमान पर्यायी कर (Minimum alternative tax)
कंपनीला भराव्या लागणाऱ्या किमान कराला Minimum Alternative Tax म्हणतात, जरी कंपनी झिरो टॅक्स लिमिटअंतर्गत येत असेल तरीही
(हे वाचा-Economic Survey 2021 : चीनपेक्षा वेगाने धावते भारतीय अर्थव्यवस्था)
कॉर्पोरेट कर (corporate tax)
कॉर्पोरेशन किंवा फर्मने मिळवलेल्या उत्पन्नावर भरलेला कर म्हणजे Corporate Tax.
रिव्हाइज्ड एस्टिमेट्स (Revised Estimates)
सहा महिन्यांतील मार्केटमधील ट्रेंडचा अभ्यास करून सहामाहीतील संभाव्य खर्च आणि रिसिट्सचा ताळमेळ साधण्याच्या दृष्टीने एक अंदाज बांधला जातो त्याला रिव्हाइज्ड एस्टिमेट म्हणतात.
अॅन्यूअल अकाउंट्स (Annual Accounts)
आर्थिक वर्ष संपल्यानंतर खर्च आणि रिसिट यांचा प्रत्यक्ष ताळमेळ लावणं म्हणजे Annual Accounts.
(हे वाचा-कोरोना काळात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, लग्नसराईच्या काळातही भारतात मागणी घटली)
अर्थसंकल्प अंदाजपत्रक (Budget Estimates)
येत्या आर्थिक वर्षात मंत्रालय किंवा योजनांना अर्थसंकल्पात किती रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे या माहितीला बजेट एस्टिमेट्स म्हणतात.
वित्तीय तूट (Fiscal Deficit)
सरकारला मिळालेल्या एकूण महसूलापेक्षा अधिक खर्च सरकारने केल्यास त्याला इकॉनॉमिक्समध्ये Fiscal Deficit म्हणजेच वित्तीय तूट म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2021, Nirmala Sitharaman