Home /News /money /

Budget 2021: वर्क फ्रॉम होम केल्यास तुमच्या हातात येणार अधिक पगार? वाचा सविस्तर

Budget 2021: वर्क फ्रॉम होम केल्यास तुमच्या हातात येणार अधिक पगार? वाचा सविस्तर

गेल्या वर्षी कोरोना व्हायरस (Coronavirus) ने जगभरात उच्छाद मांडल्यानंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Home) कल्चर आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी: कंसल्टिंग फर्म पीडब्ल्यूसी इंडिया (PWC India) ने गुरुवारी असे म्हटले आहे की, सरकारने आगामी बजेटमध्ये (Budget 2021) वर्क फ्रॉम होम (Work From Home) करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करपातीच्या (Tax Deduction) चा लाभ देण्यावर विचार करायला हवा. त्यांच्या मते सरकारने असं पाऊल उचलल्यास बाजारातील मागणी वाढेल. कोरोना काळात मागणी वाढवण्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. मागणी वाढवण्यासाठी सामान्यांच्या हातात अधिक पैसे असण्याची आवश्यकता पीडब्ल्यूसी इंडिया (PWC India) सीनिअर टॅक्स पार्टनर राहुल गर्ग यांनी बजेट पूर्व सेशनमध्ये असं म्हटलं की कोणतीही मागणी वाढवण्यासाठी सामान्यांच्या हातात अधिक पैसे असणं गरजेचं आहे. त्यांनी असे म्हटले की, हा विचार स्पष्ट आहे की कोव्हिड-19 ची परिस्थिती लक्षात घेता छोट्या आणि मध्यम करदात्यांना करामध्ये दिलासा दिला जावा, विशेषत: वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नोकरदार वर्गाला. (हे वाचा-पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला, मुंबईमध्ये पेट्रोल 92 रुपयांपेक्षा जास्त) त्यांनी असे म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होम दरम्यान कर्मचारी जो खर्च करत आहेत, जो ऑफिसमध्ये काम करताना त्यांच्या कंपनीकडून केला जात आहे, हा खर्च त्यांच्या करयोग्य उत्पन्नातून हटवले जाऊ शकते. ज्यामुळे त्याचा कर वाचला जाईल आणि त्यांच्या हातामध्ये अतिरिक्त पैसे शिल्लक राहतील. गेल्या वर्षी कोरोना व्हायरस (Coronavirus) ने जगभरात उच्छाद मांडल्यानंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Home) कल्चर आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनी खर्चामध्ये बचत होत आहे. त्यामुळे अशाप्रकारे करकपातीचा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा हा निर्णय ठरू शकेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या