• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मोदी सरकारच्या 'या' मंत्रालयाचे अधिकारी,कर्मचारी आता कुणाला भेटू शकणार नाहीत

मोदी सरकारच्या 'या' मंत्रालयाचे अधिकारी,कर्मचारी आता कुणाला भेटू शकणार नाहीत

अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेरच्या लोकांना भेटायला बंदी लागू झालीय

 • Share this:
  मुंबई, 10 जून : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातलं बजेट 5 जुलैला सादर करेल. 10 जूनपासून अर्थ मंत्रालयात क्वॅरनटाइन झालं. म्हणजे बजेट तयार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेरच्या लोकांना भेटायला बंदी लागू झालीय. ही बंदी 5 जुलैपर्यंत आहे. या काळात मीडियालाही अर्थ मंत्रालयात प्रवेश नाही. याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केलं गेलं. त्यावेळी मर्यादित काळासाठी काही खर्चांची मंजुरी दिली होती. आता नव्या सरकारात अर्थमंत्री निर्मला सीतारामण बजेट सादर करतील. सीतारामण यांची टीम अर्थमंत्री सीतारामण यांच्या टीममध्ये अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा समावेश आहे. अधिकृत टीमचे प्रमुख अर्थ सजिव सुभाषचंद्र गर्ग आहेत. या टीममध्ये अर्थ सचिव गिरीशचंद्र मुर्मू,  महसूल सचिव अजय भूषण पांडे, DIPAM चे सचिव अतनू चक्रवर्ती आणि आर्थिक सेवा सचिव राजीव कुमार यांचा समावेश आहे. सरकारी नोकरी हवी? स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी आहे 'इतक्या' जागांवर भरती पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक गुप्ततेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था - पूर्ण बजेट गुप्त ठेवण्यासाठी नाॅर्थ ब्लाॅकमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षेसाठी इलेक्ट्राॅनिक उपकरणं लावली जातात. मंत्रालयात कम्प्युटर्समध्य ई मेल सेवा ब्लाॅक राहील. या काळात मंत्रालयात प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर सुरक्षा रक्षक तैनात असतील. दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं आयबीचे लोक बजेट तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायला जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवतील. वर्षभर या उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय काय आहेत आव्हानं? - अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या पुढे अर्थव्यवस्थेला आलेली सुस्ती, आर्थिक क्षेत्रातलं संकट म्हणजे बुडणारी कर्ज, गैर बँकिंग अर्थ कंपन्यांमध्ये पैशाचं संकट, रोजगार, खासगी गुंतवणूक, निर्यात, शेती क्षेत्रात संकट आणि सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्याकडे लक्ष इतकी आव्हानं आहेत. 17व्या लोकसभेचं पहिलं सत्र 17 जूनला सुरू होईल आणि 26 जुलैपर्यंत चालेल. 4 जुलैला 2019-20चा आर्थिक आढावा सादर केला जाईल आणि दुसऱ्या दिवशी बजेट असेल. 'आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे', धनंजय मुंडे आक्रमक
  First published: