Home /News /money /

20 वर्षं पूर्ण झाल्याने BSNL ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट, Pre paid प्लॅन घेतला तर होईल फायदा

20 वर्षं पूर्ण झाल्याने BSNL ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट, Pre paid प्लॅन घेतला तर होईल फायदा

BSNL सगळ्या प्रीपेड प्लान्स (Peripad plans) वर 25 टक्के जास्त डेटा मिळणार आहे. कंपनीला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त BSNLने सगळ्या ग्राहकांना हे स्पेशल गिफ्ट दिलं आहे. काय मिळतील फायदे वाचा सविस्तर

    मुंबई, 06 ऑक्टोबर: BSNL ने ग्राहकांसाठी एक नवी प्रमोशनल ऑफर आणली आहे. BSNL  सगळ्या प्रीपेड प्लान्स (Peripad plans)वर 25 टक्के जास्त डेटा देणार आहे. ग्राहकांचा चालू असलेला डेटा प्लान, स्पेशल टॅरिफ वाऊचर्स (Stv)वर आणि नव्या डेटा प्लानवर जास्तीचा डेटा दिला जाणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही ऑफर BSNLच्या सगळ्या ग्राहकांसाठी लागू असेल. कंपनीला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त BSNLने सगळ्या ग्राहकांना हे स्पेशल गिफ्ट दिलं आहे. BSNLच्या तमिळनाडूच्या वेबसाईटवर एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. तसंच राजस्थान, तेलंगणाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही या ऑफर्सबद्दल माहिती दिली आहे. BSNLची 25 टक्के जास्त डेटा प्लानची ऑफर सगळ्या सर्कलमध्ये लागू करण्यात आली आहे. 499च्या WORK@HOME पॅकची व्हॅलिडिटी वाढवली 25 टक्के जास्त डेटा देण्यासोबतच कंपनीने ग्राहकांसाठी आणखी काही नव्या ऑफर्स आणल्या आहेत. 499 रुपयांच्या WORK@HOME पॅकची वॅलिडिटी वाढवण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार सर्कल सोडून इतर सगळ्याच ठिकाणी ही ऑफर लागू होणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 90 दिवसांसाठी फ्री इंटरनेट मिळतं. तसंच 10mbps डेटासोबत 5GB डेटाचाही लाभ मिळतो. लॉकडाऊनच्या काळात WORK@HOME पॅकला ग्राहकांची मोठी मागणी मिळत आहे. 49 रुपयांचा प्लान चेन्नई सर्कलसाठी BSNLने 49 रुपयांचा प्लान चेन्नई सर्कलसाठी बनवला आहे. या प्लानमध्ये 100 मिनिटं फ्री कॉलिंगची सेवा मिळते. या प्रीपेड प्लानमध्ये 2GB डेटा आणि 100 sms ची फ्री सुविधादेखील देण्यात आली आहे. हा स्पेशल प्लान 29 नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    पुढील बातम्या