BSF Recruitment 2019 : 10वीनंतर नोकरीची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज

इच्छुक आणि योग्य उमेदवार 12 जून 2019च्या आधी पुढील पदांसाठी अर्ज करू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 05:49 PM IST

BSF Recruitment 2019 : 10वीनंतर नोकरीची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज

मुंबई, 17 एप्रिल : तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात, तर एक मोठी संधी आहे. बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स ( BSF )नं ग्रुप सीच्या हेड काॅन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार 12 जून 2019च्या आधी पुढील पदांसाठी अर्ज करू शकतात.

1072 हेड काॅन्स्टेबल पदांसाठी BSF भरती प्रक्रिया 14 मेपासून सुरू होणार आहे. ती 12 जून 2019ला संपेल. बीएसएफमध्ये करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. या 1072 पदांमध्ये 300 पदं हेड काॅन्स्टेबल ( रेडिओ आॅपरेटर ) आणि 772 पदं हेड काॅन्स्टेबल ( रेडिओ मेकॅनिक )ची आहेत. इथे फक्त आॅनलाइनच अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा

आॅनलाइन अ‍ॅप्लिकेशनची सुरुवात -  14 मे 2019

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 जून 2019

Loading...

पदं

हेड काॅन्स्टेबल (रेडियो ऑपरेटर) – 300 पद

हेड काॅन्स्टेबल (रेडियो मेकॅनिक)- 772 पद

हेड काॅन्स्टेबल पदासाठी योग्यता

शैक्षणिक योग्यता - उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी, 12वी किंवा समांतर आणि संबंधित विषयात दोन वर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं प्रमाणपत्र असलेला

वय - 18 ते 25 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात ( आरक्षित श्रेणीच्या उमेदवारांसाठी सरकारी नियमांप्रमाणे वयात सवलत )

ही प्रक्रिया 14 मेपासून सुरू होणार आहे. ती 12 जून 2019ला संपेल. हे करियर खूप आव्हानात्मक आहे. देशासाठी काही करायची इच्छा असणाऱ्या तरुणांना नेहमीच अशा गोष्टींची भुरळ पडते. तगडी मेहनत करायची तयारी असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.


VIDEO: कर भरूनही पाणी नाही; पुण्याच्या 'या' उच्चभ्रू वस्तीतल्या नागरिकांचं 'No Vote' आंदोलन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...