पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये

पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये

कोरोनाच्या काळात तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. घरबसल्या Netflix वर तुमच्या आवडत्या शोचे 3 एपिसोड बघायचे आहेत आणि कपड्यांचे निरीक्षण करायचे आहेत.

  • Share this:

लंडन, 29 सप्टेंबर : असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण खरोखर प्रत्यक्षात येऊ शकते. पायजमा घालून आरामात घरी सोफ्यावर बसून किंवा लोळत वेबसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला मानधन मिळू शकतं. जगात कुठेही बसून (लोळून) काम केलंत तरी तुम्हाला ही नोकरीची ऑफर आहे. आरामदायी कपड्यांचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला 300 युरोंचं म्हणजेच  सुमारे 28 हजार 515 रुपयांचं मानधन मिळू शकतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घरातून पाऊलही बाहेर टाकावं लागणार नाही.

हे स्वप्न नसून सत्य आहे, ब्रिटनमधील पॉर मोई Pour Moi या कपड्यांच्या कंपनीने ही आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिवसभर घरात पायजमा घालून निवांत सोफ्यावर बसून Netflix च्या वेबसीरिजचा आनंद लुटायचा आणि या कंपनीचे घरात वापरायचे कपडे वापरून कसं वाटलं हे त्यांना सागायचं. या कामासाठी तुम्हाला पैसे देण्याची घोषणा या कंपनीने केली आहे. सध्या अनेक लोक घरूनच काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणं हा सर्वांत महत्त्वाचा उपाय मानला जात असल्याने ही संकल्पना राबवली जात आहे. अशाच काळात केवळ टीव्ही पाहण्याचे पैसे तुम्हाला कुणी दिले तर किती चांगलं होईल असा विचार तुमच्या मनात येऊन गेलाच असेल. तेच ही कंपनी करते आहे.

घरी बसून कपड्यांच्या परीक्षणाच्या या नोकरीसाठी तुम्ही 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता. comfy clothing tester अशी ही पोस्ट आहे. जर यासाठी तुम्ही अर्ज करण्याच्या विचारात असाल तर कंपनीनी याबाबत असंख्य नियम दिलेले आहे. या ब्रँडने जाहिरातीत अगदी छोट्या फाँटमध्ये हे असंख्य नियम लिहिले आहेत़.  जर तुम्ही यात भाग्यवान उमेदवार ठरलात तर तुम्ही तुमच्या सोफा किंवा बेडवर बसून आपल्या आवडत्या टीव्ही शोचे 3 एपिसोड पहावे, यासह वाईनचा किंवा हॉट चॉकलेटचा आनंद घ्यावा,  एक कप चहा किंवा हॉट ड्रिंक्सचा आनंद घ्या आणि किमान 10 मिनिटं सोशल मीडियावर फेरफटका मारा या गोष्टी तुम्ही करू शकाल असं या जाहिरातीत म्हटलं आहे.

या जॉबसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी दहा तासांसाठी पॉर मोईचे कपडे घालावे लागतील, आणि 28 हजारांची रक्कम मिळवण्यासाठी ते कपडे वापरण्याचा अनुभव कसा होता याचा एक रिपोर्ट तुम्हाला द्यावा लागेल. यासह निवड झालेल्या उमेदवारांना दिवसातून अनेकदा आपला पोषाख बदलवा लागणार आहे. जेणेकरून पॉर मोईने दिलेल्या कपड्यांचे परीक्षण करता येईल. हे कपडे तुम्ही स्वत:जवळच ठेवू शकता.

हे कपडे वापरल्याचे फोटो  सोशल मीडियावर टाका अशी अट यामध्ये नाही.  वयाची 18 वर्ष पूर्ण केलेलं कुणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतं. 12 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार असून, 26 ऑक्टोबरला भाग्यवान उमेदवारांची नावं जाहीर केली जातील.

Published by: Amruta Abhyankar
First published: September 29, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading