मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँकेच्या चुकीमुळे ग्राहक झाले मालामाल! ग्राहकांच्या खात्यात थोडथोडके नाही तर आले 1303 कोटी

बँकेच्या चुकीमुळे ग्राहक झाले मालामाल! ग्राहकांच्या खात्यात थोडथोडके नाही तर आले 1303 कोटी

थोडेथोडके नाही तर या बँकेने तब्बल 1303 कोटी रुपये ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. आता हे पैसे वसूल करणं बँकेला नक्कीच जड जाणार आहे

थोडेथोडके नाही तर या बँकेने तब्बल 1303 कोटी रुपये ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. आता हे पैसे वसूल करणं बँकेला नक्कीच जड जाणार आहे

थोडेथोडके नाही तर या बँकेने तब्बल 1303 कोटी रुपये ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. आता हे पैसे वसूल करणं बँकेला नक्कीच जड जाणार आहे

लंडन, 31 डिसेंबर: कधीकधी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना दुसऱ्याच खात्यावर पैसे पाठवण्याची चुक अनेकांकडून घडते. त्यामुळे पैसे पाठवताना आपण नेहमी दोन-तीन वेळा तपासून पुढील प्रक्रिया करतो. पण बँकांचे व्यवहार मोठ्या स्तरावर असतात. विचार करा जर बँकेकडूनच अशाप्रकारे चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले गेले तर? यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी असाच प्रकार एका बँकेसह घडला आहे. थोडेथोडके नाही तर या बँकेने तब्बल 1303 कोटी रुपये ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत.

ब्रिटनमधील सॅनटेंडर बँकेसह (Santander Bank Mistakenly transferred 1303 crore to customers account) हा प्रकार घडला आहे. या बँकेने ग्राहकांच्या खात्यावर चुकून 13 कोटी पौंड अर्थात 1303 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. जवळपास 75 हजार ग्राहकांना ही रक्कम पाठवण्यात आली आहे. आता ख्रिसमसचा बोनस समजून जर या ग्राहकांनी हे पैसे खर्च केले असतील तर ते रिकव्हर करणं बँकेला कठीण जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की सेंटेंडर बँकेकडून या ग्राहकांना ख्रिसमसच्या दिवशी 2000 कंपन्यांच्या या ग्राहकांना नियमित पेमेंट केले जात होते. मात्र ही प्रक्रिया चुकून दोन वेळा करण्यात आली. पहिल्यांदा पैसे कंपन्यांच्या खात्यातून गेले आणि दुसऱ्यांदा मात्र हा भार बँकेला सहन करावा लागला आहे.

हे वाचा-Multibagger Share : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार श्रीमंत; 1 लाख बनले 3.37 कोटी

ग्राहकांना पैसे करावे लागणार परत

UK Theft Act 1968 नुसार, बँका ग्राहकाच्या खात्यात चुकून जमा झालेले पैसे वसूल करून घेऊ शकतात. जर ग्राहकांनी पैसे परत केले नाहीत तर त्यांना जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. मात्र हे पैसे वसूल करणे बँकेसाठी कठीण आहे कारण साधरण 75 हजार ग्राहकांना हे पैसे दोन वेळा ट्रान्सफर झाले आहेत. दरम्यान या बँकेचे जवळपास 1.40 कोटी ग्राहक आहेत. मीडिया अहवालांनुसार, UK मध्ये पेमेंट सिस्टम चालवणाऱ्या Pay-UK ने सॅनटेंडर बँकेशी रिकव्हरीबाबत बोलणी सुरू केली आहेत. बँकेच्या प्रवक्त्यानुसार हे ट्रान्सफर झालेले पैसे बँकिंग क्षेत्राच्या विहित प्रक्रियेनुसारच वसूल केले जाणार आहेत. ज्या खात्यांमध्ये दोनदा रक्कम जमा झाली आहे त्यांची ओळख पटवली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, Money, बँक