तिरंग्याची शान वाढली, भारत जगातील टॉप टेन 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या देशांमध्ये

तिरंग्याची शान वाढली, भारत जगातील टॉप टेन 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या देशांमध्ये

सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून त्यांची ब्रँड व्हॅल्यू 1970 लाख कोटी रुपये इतकी आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : जगातील सर्वात मुल्यवान देशांच्या ब्रँडमध्ये भारताने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. या यादीमध्ये टॉप टेनमध्ये भारताचा समावेश झाला असून देशाची ब्रँड व्हॅल्यू 18 टक्क्यांनी वाढली आहे. भारताची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 181 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. जगातील ब्रँड फायनान्सकडून ही यादी तयार करण्यात आली असून यामध्ये अमेरिकेनं पहिला क्रमांक पटकावला आहे.

ब्रँड फायनान्सनुसार अमेरिकेची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. या देशाचे सर्वाधिक मुल्य हे अर्थतंत्रातून येतं. याशिवाय शिक्षण व्यवस्था, सॉफ्टवेअर उद्योग, मनोरंजन क्षेत्राचंही योगदान आहे. अमेरिकेची ब्रँड व्हॅल्यू एका वर्षात 7.1 टक्क्यांनी वाढली असून ती जवळपास 1970 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.

भारताचा शेजारी देश असलेल्या चीन यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची ब्रँड व्हॅल्यूमध्ये एका वर्षात तब्बल 40 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या त्यांची ब्रँड व्हॅल्यू 1383 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनीचा नंबर लागतो. त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 5.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू 344 लाख कोटी रुपये झाली आहे.

जापानने या यादीत एक स्थान वरती झेप घेतली. याआधी ते पाचव्या स्थानी होते. एका वर्षांत ब्रँड व्हॅल्यूत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या जपानची ब्रँड व्हॅल्यू 321 लाख कोटी इतकी झाली आहे. पाचव्या क्रमांकावर युनायटेड किंगडम असून त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 2.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. युकेची ब्रँड व्हॅल्यू 273 लाख कोटी आहे.

आगामी पाच वर्षांत देशातील सर्व ब्रँडच्या उत्पादनांच्या विक्रीच्या अंदाजावर देशाची ब्रँड व्हॅल्यू काढली जाते. देशाच्या जीडीपीला एकूण देशाचं उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जातं.

जिथे तलवार चालली त्या गडांवर छमछम वाजणार का? पवारांचा भाजपला सवाल

Published by: Suraj Yadav
First published: October 12, 2019, 2:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या