मराठी बातम्या /बातम्या /मनी /बॉस असावा तर असा! 11 वर्षं कामात सोबत करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली मर्सिडीज भेट

बॉस असावा तर असा! 11 वर्षं कामात सोबत करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली मर्सिडीज भेट

रस्त्यावरून जाणारी एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात.

रस्त्यावरून जाणारी एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात.

रस्त्यावरून जाणारी एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Kerala, India

  मुंबई: रस्त्यावरून जाणारी एखादी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी किंवा अशीच एखादी महागडी कार दिसली, की अनेकांचे डोळे दिपून जातात. अशी गाडी घेणं अनेकांचं स्वप्न असतं. काही लाखांची किंमत असणारी अशीच एखादी गाडी एखाद्या कर्मचाऱ्याला तो काम करत असलेल्या कंपनीच्या मालकानं भेट दिली तर? असाच काहीसा प्रकार एका कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला आहे. त्याला त्याच्या मालकानं चक्क 57 लाख रुपयांची मर्सिडीज गाडी भेट दिली आहे.

  मार्च महिना जवळ येताच कर्मचाऱ्यांना अपरायझलचे वेध लागतात. या काळात जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये कर्मचारी मनापासून कामात व्यस्त असतात. एखाद्या कर्मचाऱ्यानं वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ एप्रिल-मेमध्ये नक्की मिळतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील क्लिंट अँटोनी हा कर्मचारी.

  अँटोनी यांना ते काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकानं तब्बल 57 लाख रुपये किमतीची लक्झरी सेडान मर्सिडीज बेंझ सी-क्लास ही कार भेट दिली आहे. ते गेल्या 11 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळे त्यांना ही कार भेट म्हणून देण्यात आलीय.

  क्लिंट अँटोनी यांना भेट देण्यात आलेल्या मर्सिडीज बेंझ सी-क्लासची किंमत जवळपास 57 लाख रुपये आहे. ही लक्झरी सेडान 1496 ते 1993 cc पर्यंतच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनद्वारे चालते, जी 300 bhp पर्यंत पॉवर आणि 550 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

  म्हणून दिली कार भेट

  क्लिंट अँटोनी हे वेबँडक्राफ्ट या आयटी कंपनीमध्ये काम करतात. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे ते पहिले कर्मचारी आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते कंपनीचे सर्वात निष्ठावान आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी आहेत. कंपनीच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

  कंपनीमध्ये ते मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर म्हणून काम करतात. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांच्या मते, ‘क्लिंट यांनी एक निष्ठावान कर्मचारी म्हणून कंपनीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच आम्हाला त्यांना लक्झरी सेडान कार भेट म्हणून देताना खूप आनंद झाला.’

  View this post on Instagram

  A post shared by Shaji Ak (@shaji_ak)

  दरम्यान, तुम्हीही एखाद्या कंपनीत खूप वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत असाल, तर तुम्हालाही अशा पद्धतीनं फळ मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. पण त्यासाठी कंपनीसोबत निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही केलेल्या कष्टाच फळ मिळण्याची शक्यता अधिक असते.

  First published:
  top videos

   Tags: Kerala