आता Amazonवर फक्त 1000 रुपयात करा 'ही' बाइक बुक

आता Amazonवर फक्त 1000 रुपयात करा 'ही' बाइक बुक

Amazon, E commerce - तुम्हाला मोटरबाइक खरेदी करायची असेल तर अमेझाॅनवर ऑनलाइन बुक करू शकता.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : तुम्ही अमेझाॅनवर अनेक गोष्टी खरेदी करत असाल. आतापर्यंत मोबाइल फोन, घरचं सामान या गोष्टी ऑनलाइन खरेदी केल्या असतीलच, पण आता तुम्ही बाइकही खरेदी करू शकता. तुम्ही अमेझाॅनवर 1000 रुपयांत ऑनलाइन बाइक बुक करू शकता.

आतापर्यंत 2500पेक्षा जास्त बुकिंग

Revolt RV 400 ऑल-इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतात 18 जूनला लाँच झाली होती आणि कंपनीला बाइकचं बुकिंग 25 जूनपासून त्यांच्या ऑफिशियल वेबसाइटवर मिळणं सुरू झालं. त्यानंतर 5 जुलैपासून या बाइकचं बुकिंग Amazon वर सुरू झालं होतं. आतापर्यंत 2500पेक्षा जास्त बुकिंग झालंय. पुणे आणि दिल्ली इथल्या ग्राहकांसाठी  1 हजार रुपयात बुकिंग सुरू झालं होतं.

भारतीय रेल्वेच्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये मिळतील विमानासारख्या 'या' 6 सुविधा

एकदा चार्ज केली तर 156 किमी चालते

Revolt RV 400 एकदा का पूर्ण चार्ज केली तर 156 किलोमीटरची रेंज कव्हर करते. या बाइकला 15 एम्पियरच्या साॅकेटमध्ये प्लग करून चार्ज करता येईल. पूर्ण चार्ज व्हायला ही बाइक 4 तास घेते. बाइकची बॅटरी बदलता येते.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

सध्याच्या ऑनलाइन युगात या पद्धती आता खूप हायटेक झाल्या आहेत. याआधी किराणा सामानाची यादी वाण्याकडे देऊन सामान मागवणं किंवा मंडईत जाऊन भाजी आणणं हे आता जुनं झालं. आता जमाना ऑनलाइनचा आहे आणि अ‍मेझॉनसारख्या कंपन्या यामध्ये आघाडीवर आहेत.

सरकारच्या मदतीनं सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवा 1 लाखाहून जास्त

सिअ‍ॅटलमधल्या एका गॅरेजमध्य सुरुवात करून अ‍मेझॉनसारखी कंपनी जगातली सगळ्यात मोठी इ कॉमर्स कंपनी कशी बनली याबदद्लची कथा खूपच रंजक आहे. याच अ‍मेझॉन कंपनीसाठी भाजीपाला आणि किराणा सामानाचा ऑनलाइन व्यापार सोपा असेल, असं आपल्याला वाटेल पण तसं नव्हतं.

भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाचा व्यापार करण्यामध्ये अनेक आव्हानं होती. त्यामुळे अ‍मेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस हेही यात हात घालत नव्हते. पण 2007 मध्ये त्यांनी अ‍मेझॉन फ्रेश लाँच केलं आणि या ऑनलाइन मार्केटचा नजारा बदलला.

असं असेल भारताचं चांद्रयान 2 मिशन, हा VIDEO पाहाच!

First published: July 13, 2019, 8:09 PM IST
Tags: amezon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading