Home /News /money /

BoAt च्या पॅरंट कंपनीचा 2000 कोटींच्या IPO साठी सेबीकडे अर्ज दाखल, वाचा सविस्तर माहिती

BoAt च्या पॅरंट कंपनीचा 2000 कोटींच्या IPO साठी सेबीकडे अर्ज दाखल, वाचा सविस्तर माहिती

BoAt ची स्थापना 2016 मध्ये समीर मेहता आणि अमन गुप्ता यांनी केली होती. कंपनीचे स्वतःचे कोणतेही उत्पादन युनिट नाही. ते चीनमधून उत्पादने खरेदी करते आणि त्यांचे ब्रँडिंग करून त्यांची विक्री करते.

    मुंबई, 27 जानेवारी : BoAt ब्रँड अंतर्गत देशात इयरफोन (Earphones) आणि स्मार्ट वॉच (Smart Watch) विकणार्‍या कंपनीच्या पॅरेन्ट असलेल्या इमॅजिन मार्केटिंगने SEBI कडे 2000 कोटी रुपयांच्या IPO साठी ड्राफ्ट पेपर दाखल केले आहेत. इमॅजिन मार्केटिंगच्या (Imagine Marketing) या IPO मध्ये 9 अब्ज रुपयांचा फ्रेश इश्यू असेल तर 11 अब्ज रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल. साउथ लेक इन्व्हेस्टमेंट्स (South Lake Investments) आयपीओच्या ऑफर फॉर सेलमध्ये 8 अब्ज रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. Axis Capital, BoFA Securities, Credit Suisse Securities, ICICI Securities या आयपीओचे बुकरनिंग लीड मॅनेजर आहेत. कंपनी IPO मधून मिळणारे पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरेल. Income Tax च्या नव्या स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल, केवळ 5 टक्के लोकांची पसंती BoAt ची स्थापना 2016 मध्ये समीर मेहता आणि अमन गुप्ता यांनी केली होती. ही स्टार्टअप कंपनी Headphones, Earphones, Wearables, Speakers Headphones, Earphones, Speakers आणि charger यांसारखी उत्पादने विकते. इअर वेअरेबल श्रेणीमध्ये त्याचा 45.5 टक्के बाजार हिस्सा आहे तर वेअरेबल वॉच श्रेणीत 26.9 टक्के हिस्सा आहे. एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती कंपनीचे स्वतःचे कोणतेही उत्पादन युनिट नाही. ते चीनमधून उत्पादने खरेदी करते आणि त्यांचे ब्रँडिंग करून त्यांची विक्री करते. मात्र कंपनी स्वतःचे उत्पादन युनिट आणि आर अँड डी विभाग स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. BoAt ही मुंबईस्थित कंपनी आहे. BoAt ची मालकी ब्रँड इमॅजिन मार्केटिंग प्रा. लिमिटेड कंपनीकडे आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या