असिस्टंट कमिशनरकडे सापडली 150 कोटींची काळी कमाई! अलिशान बंगले, गाड्या आणि जमिनी

असिस्टंट कमिशनरकडे सापडली 150 कोटींची काळी कमाई! अलिशान बंगले, गाड्या आणि जमिनी

आलोक खरेकडे अब्जावधींची संपत्ती सापडली आहे. हा सगळा काळा पैसा आहे. आलोक खरेशी संबंधित 5 ठिकाणी जेव्हा लोकायुक्त पोलिसांनी धाडी टाकल्या तेव्हा त्याची ही संपत्ती बघून पोलिसांचं पथकही हैराण झालं.

  • Share this:

इंदौर, 14 ऑक्टोबर : मध्य प्रदेशच्या अबकारी विभागाचा सहाय्यक आयुत्त आलोक खरे याच्याकडे कोट्यवधींची नाही तर अब्जावधींची संपत्ती सापडली आहे. हा सगळा काळा पैसा आहे. आलोक खरेशी संबंधित 5 ठिकाणी जेव्हा लोकायुक्त पोलिसांनी धाडी टाकल्या तेव्हा त्याची ही संपत्ती बघून पोलिसांची ही टीमही हैराण झाली.

आलोककुमार खरेकडे 150 कोटींपेक्षा जास्त बेहिशोबी संपत्ती सापडली. मध्य प्रदेशमध्ये अनेक शहरांत त्याची 21 ठिकाणी मालमत्ता होती. यात अलिशान बंगले, जमिनी, गाड्या, सोनं-चांदीचे दागिने या सगळ्याचा समावेश आहे.

85 हजारांची खुर्ची

आलोक खरेची ऑफिसमध्ये बसण्यासाठीची खुर्चीच 85 हजार रुपयांची होती.खरगोन, रतलाम, धार आणि इंदौर या जिल्ह्यांमध्ये आलोक खरेने काम केलं होतं. इथेच त्याने अब्जावधींचा काळा पैसा जमवला. त्याच्याविरुद्ध अनेकदा तक्रारी होऊनही कारवाई होत नव्हती.या सगळ्यावर कडी म्हणजे हा आलोक खरे एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करत होता.या भ्रष्ट अधिकाऱ्याचा पगार होता 1 लाख रुपये आणि 23 वर्षांत त्याने अब्जावधींची माया जमवली.

(हेही वाचा : तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना?)

महागड्या भागात फ्लॅट

लोकायुक्त पोलिसांचं पथक जेव्हा आलोक खरेच्या इंदूरच्या घरी पोहोचलं तेव्हा तो ड्युटीवर नव्हता. आता त्याच्यावर कारवाई झाली आहे. आलोक खरेने इंदूरच्या सगळ्यात महागड्या भागात ग्रँड एक्झॉटिका हाइट्समध्ये फ्लॅटही घेतला होता.

======================================================================================

विठुरायाच्या बाजूला उभा असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या