मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Bitcoin ची किंमत गडगडली, गेल्या 20 दिवसातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली

Bitcoin ची किंमत गडगडली, गेल्या 20 दिवसातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली

8 फेब्रुवारीला एका बिटकाइनची (Bitcoin Rate) किंमत तब्बल 60 हजार डॉलर्स इतकी झाली होती. तेव्हापासून वरच्या दिशेने जाणाऱ्या या आभासी आभासी चलनाला रविवारी खिळ बसली आहे. बिटकॉइनच्या किंमती ढासळल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 मार्च: बिटकॉइन हे जगातील सर्वात मोठं आभासी चलन मानलं जातं. गेल्या काही काळापासून बिटकॉइनचे भाव गगनाला भिडत होते. काही दिवसांपूर्वी 8 फेब्रुवारीला एका बिटकाइनची किंमत तब्बल 60 हजार डॉलर्स इतकी झाली होती. तेव्हापासून वरच्या दिशेने जाणाऱ्या या आभासी आभासी चलनाला रविवारी खिळ बसली आहे. रविवारी बिटकॉइनच्या किंमती ढासळल्या असून 8 फेब्रुवारी पासूनची सर्वात निच्चांकी गाठली आहे. बिटकॉइनची किंमत शुक्रवारपासून 3.7 टक्क्यांनी घसरली आहे.

यावर्षी बिटकॉइनच्या किंमतीत 70 टक्क्यांनी वाढ झाली

या वर्षाच्या सुरूवातीलाच बिटकॉइनच्या किंमतीत तब्बल 70 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. मुख्य प्रवाहातील गुंतवणूक आणि पेमेंट व्हीकलमधील वाढता विश्वास लक्षात घेता, गेल्या आठवड्यात बिटकॉइनने 58,354.14 डॉलरची विक्रमी मजल मारली होती. एका वर्षापूर्वी बिटकॉइनच्या एका युनिटची किंमत अवघी 10 हजार डॉलर्स एवढी होती.

टेस्लाने गुंतवणूक करताच बिटकॉइनने मजल मारली

अलीकडेच इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला या अमेरिकन कंपनीने क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. तेव्हापासून बिटकॉइनचे भाव वधारतचं चालले आहेत. त्यानंतर पहिल्यांदा काल रविवारी बिटकॉइनच्या वाढत्या किंमतीला खिळ बसली आहे. टेस्लासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्यांनी बिटकॉइनला डिजिटल चलन म्हणून मान्यता दिली आहे. टेस्ला व्यतिरिक्त इन्सुरन्स विमा कंपनी मास-म्युच्युअल, अॅसेट मॅनेजमेंट गॅलक्सी डिजिटल होल्डिंग, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांची पेमेंट कंपनी स्क्वायरनेही बिटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे बिटकॉइनच्या किंमती गगनाला भिडत आहेत.

हे ही वाचा -आजपासून मोदी सरकारकडून स्वस्तात खरेदी करा सोनं,ऑनलाइन खरेदी केल्यास अतिरिक्त सूट

'ब्लू रिज बँक ऑफ शर्लोविला' बिटकॉइनची सुविधा उपलब्ध करुन देणार

टेस्ला कंपनीनेने गेल्या आठवड्यात स्पष्ट केलं होतं की, कंपनी गुंतवणूकीचं धोरण म्हणून बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची खरेदी करीत आहे. शिवाय कंपनी लवकरच आपल्या उत्पादनांच्या खरेदीसाठी बिटकॉइनद्वारे देयक देण्यासाठी सुविधा मंजूर करण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे बिटकॉइनने जोरदार मजल मारली आहे. त्यानंतर, व्हर्जिनियामधील 'ब्ल्यू रिज बँक ऑफ शेर्लोविला' ने सांगितलं की, ही बँक सर्व शाखांमध्ये बिटकॉइनची सुविधा उपलब्ध करुन देणारी ही जगातील पहिली व्यावसायिक बँक बनणार आहे.

First published:

Tags: Money