वडे तळलेल्या तेलावर चालू शकते कार! मोदी सरकारची नवी योजना

केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं तेल पुन्हा वापरण्याची एक पद्धत आली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या तेलाचं बायोडिझेल बनवलं जाईल.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 08:24 PM IST

वडे तळलेल्या तेलावर चालू शकते कार! मोदी सरकारची नवी योजना

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : केंद्र सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं तेल पुन्हा वापरण्याची एक पद्धत आली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेल्या तेलाचं बायोडिझेल बनवलं जाईल.

स्वयंपाकासाठी बनवलेलं तेल जर पुन्हा वापरलं तर ते आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतं. त्यामुळेच HPCL, BPCL, IOC या सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या बायोडिझेल बनवण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांशी करार करणार आहेत. हे बायोडिझेल बनवण्यासाठी वेगळे प्लँट उभारले जातील. तेल कंपन्या हे बायोडिझेल 51 रुपये प्रतिलिटर दराने घेतील. त्यानंतर याची किंमत वाढू शकते.

आपल्याकडचं वापरलेलं स्वयंपाकाचं तेल जर जमा केलं तर हे तेल वापरता येईल. यासाठी 1800112100 या फोनवर संपर्क करून कुकिंग ऑइल जमा करता येईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रयोगाला सुरुवात केली आहे.

तेलासाठी मोबाइल अ‍ॅप

Loading...

स्वयंपाकाचं तेल एका ठिकाणी जमा करण्यासाठी एक मोबाइल अप लाँच करण्यात आलं आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये याबदद्लचे एक स्टिकर लावले जातील. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं तेल बायोडिझेलसाठी वापरण्यात येतं, असं यावर लिहिलं जाणार आहे.

स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलामुळे ब्लड प्रेशर, अल्झायमर आणि यकृताशी जोडलेले आजार होऊ शकतात. त्यामुळेच खबरदारी घ्यावी लागणार आहे. सध्या बॉयो- डी ही कंपनी स्वयंपाकाचं तेल वापरून डिझेल बनवते. दिल्लीमध्ये या तेलाचा दर 22 ते 24 रुपये लिटर ठरवण्यात आला आहे. कानपूर, लखनौ अशा ठिकाणी हे तेल 15 रुपये लिटर दराने खरेदी करण्याची चर्चा आहे. त्यासाठीची वाहतूक धरून होणाऱ्या खर्चाचं कारण दिलं जातं. नंतर मात्र हेच तेल 51 रुपये प्रतिलिटर ने विकलं जातं. त्यामुळे हॉटलमालक चिंतेत आहेत.

====================================================================================

VIDEO : नाथाभाऊ हे चुकीचं आहे, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...