नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : मंगलवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister of India) यांनी 2 व्हीलरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या GST कौन्सिलच्या 41व्या बैठकीत ऑटो इंडस्ट्रीच्या या मागणीवर अर्थमंत्री विचार करू शकतात. या बातमीनंतर बजाज ऑटो (Bajaj Auto) चे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले की, जर सरकार दुचाकीवरील GST मध्ये (GST on two wheeler) घट केल्याने मोठा फायदा होईल. ते म्हणाले या संकटाच्या काळात सरकारला इन्सेंटिव द्यायला हवा, ज्यामुळे कंपन्यांची परिस्थिती स्थिरावेल. सध्याच्या काळात ऑटो सेक्टरवर 28 टक्के जीएसटी वसूल केलं जातं.
हे वाचा-जागतिक स्तरावर सोन्याचे दर पुन्हा उतरले, देशांतर्गत बाजारात 5000 रुपयांची घसरण
फेस्टिव सीजन (Festive Season) मध्ये दुचाकी स्वस्त होऊ शकतात, असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी दिला होता. गुड्स अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (GST) कौन्सिल दुचाकी वाहनांवर टॅक्स कमी करण्याचा प्रस्तावावर अॅक्शन घेणार आहे. कारण हे लक्जरी वा डिमेरिट गूड नाही. सध्या दुचाकी वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावले जाते.
राजीव बजाज यांनी पुढे सांगितले की, जर GST 28 टक्क्यांहून कमी करीत 18 टक्क्यांपर्यंत केलं जातं, तर बाईकची किंमत 8000 ते 10,000 रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
काय अर्थमंत्र्यांच्या संकेतानुसार सणांच्या काळापूर्वी दुचाकी वाहनांमध्ये टॅक्स कमी करण्याची मागणी वाढू शकते आणि अशावेळी जेव्हा कोरोना व्हायरसचा कहर असल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खासगी विक्री मंदावली आहे.