मुंबई, 06 एप्रिल : बिकानेरी नमकीनचा आस्वाद अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांवर भारी पडतोय. बिकानेर ब्रँड तीन अग्रवाल कुटुंबाचा आहे. 2018मध्ये त्यांनी 7,042 कोटींचे स्नॅक्स विकले. ही भारतातल्या एकूण पॅक्ड स्नॅक्स मार्केटच्या एक चतुर्थांश कमाई आहे. देशी नमकिनवरही यांचंच वर्चस्व आहे.
मल्टिनॅशनल कंपनींवर भारी बिकानेरी नमकीन
इकाॅनाॅमिक्स टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार नीलसन डाटानं सांगितलंय की हल्दीराम, बिकाजी आणि बिकानेरवाला यांनी गेल्या वर्षभरात 7,042 कोटी रुपयांची विक्री केली. पाश्चात्य देशांमध्ये पोटॅटो चिप्सना जास्त मागणी आहे. तसं असूनही या तिघांनी गेल्या काही वर्षांत 1500 कोटींनी विक्री वाढवलीय. पश्चिम राजस्थानच्या अग्रवाल कुटुंबानं पेप्सिको आणि ITC सारख्या कंपन्यांना या शर्यतीतून बाहेर काढलं.
हल्दिराम संस्थापक कुटुंबातली चौथी पिढी कमल अग्रवालनं सांगितलं, हा व्यवसाय आमच्या रक्तात आहे. गेल्या 80 वर्षातलं आमचं हे काम आहे. यात पूर्ण कुटुंब सहभागी असतं. ग्राहकांना काय हवंय, त्यांची चव काय आहे, याचा विचार करतच जलद निर्णय घ्यावा लागतो. बाजाराची नस समजणं महत्त्वाचं असतं.
व्यवसाय सुरू होऊन झाली 82 वर्ष
कुटुंबानं 1937मध्ये बिकानेरमध्ये एका छोट्या दुकानात आपला व्यापार सुरू केला होता. अनेक वाद झाले. कुटुंब तुटलं. त्यानंतर या व्यवसायाची वाढ झाली. व्यवसायात वृद्धी झाली. यात हल्दीराम सर्वात मोठा ब्रँड आहे. या ब्रँडच्या खाली बिकानेरवाला, भिखाराम चंदामल, बिकाजी आणि बिकानो यांचा समावेश आहे.
हल्दीराम यांनी पेप्सीला टाकलं होतं मागे
हल्दीरामनं दोन वर्षांपूर्वी पेप्सीला मागे टाकलं होतं.2018मध्ये 5,532 कोटी रुपयांची उत्पादनं विकली होती. या कंपनीचं काम तीन ठिकाणाहून चालतं. त्यात उत्तरेकडे हल्दीराम मॅन्युफॅक्चरिंग, पश्चिम आणि दक्षिणेत हल्दीराम फूड आणि पूर्वेत हल्दीराम भुजियावाल आहे.
गुढीपाडव्यानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं; पाहा VIDEO