PNB-DHFL Fraud: पीएनबीमध्ये DHFL खात्यात 3,688 कोटींचा घोटाळा, बँकेचा आरबीआयकडे अहवाल

PNB-DHFL Fraud: पीएनबीमध्ये DHFL खात्यात 3,688 कोटींचा घोटाळा, बँकेचा आरबीआयकडे अहवाल

नीरव मोदी आणि मेहून चोक्सीने कोट्यवधींचा चूना लावल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank PNB) पुन्हा एकदा घोटाळ्याचा सामना करावा लागत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै : नीरव मोदी आणि मेहून चोक्सीने कोट्यवधींचा चूना लावल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank PNB) पुन्हा एकदा घोटाळ्याचा सामना करावा लागत आहे. बँकेने दिनान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला (Dewan Housing Finance Ltd.) दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचे कर्ज फ्रॉड घोषित केले आहे. बँकेने आरबीआयला या संदर्भातील माहिती दिली आहे. बँकेने गुरुवारी 3,688.58 कोटींच्या घोटाळ्याची माहिती RBI ला दिली.

गेल्या 3 वर्षामध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेला हा चौथा घोटाळा आहे. नॉन-बँकिंग फायनान्शिल कंपनी असणारी दिवान हाऊसिंग फायनान्स सध्या कर्जबाजारी झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की त्यांनी या घटनेसंदर्भात 1,246.58 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2018 मध्ये फरार नीरव मोदीने केलेला घोटाळा पकडून बँकेला 11,300 कोटींच्या घोटाळ्याला सामोरे जावे लागले होते.

(हे वाचा-RIL आणि BP यांचा संयुक्त उपक्रम; नवा फ्यूएल आणि मोबिलिटी व्यवसाय सुरू)

बँक व्यवस्थापनाकडून या आणि अशा इतर घोटाळ्याची व्याप्ती तपासली जात आहे. त्याकरता डीएचएफलचे प्रमोटर आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कर्जाची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) आणि युनियन बँकेने (Union Bank) देखील दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे खाते फसवे घोषित केले आहे.

पंजाब नॅशनल बँकेने जुनमध्ये दिलेल्या अहवालानुसार वित्तीय वर्ष 2019-20 च्या चौथ्या तिमाहीत सुमारे, 73,500 कोटी रुपयांची एकूण नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता किंवा बॅड लोनची नोंद केली. एकूण कर्जाच्या टक्केवारीनुसार, ग्रॉस एनपीए 14.21 टक्के होते, तर मागील तिमाहीत ते 15.5 टक्के होते.

Yes Bank घोटाळा प्रकरणी गुरुवारी झाली होती कारवाई

Yes Bank घोटाळा प्रकरणी अखेर सक्तवसुली संचालनालय (ED) ने बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 2200 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच येणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 12:23 PM IST

ताज्या बातम्या