मुंबई, 23 एप्रिल : प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनमधल्या नियमांनुसार कॅश ट्रॅन्झॅक्शन करणाऱ्यांना इन्कम टॅक्स विभागानं नोटिस पाठवायला सुरुवात केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार जवळजवळ 27 हजार लोकांना ही नोटिस जाणार आहे. इन्कम टॅक्स तपासणीत 26,830 खटले समोर आलेत. जवळजवळ 7 हजार कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे.
हे सर्व खटले 2018-19मधले आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त पैशांच्या देवाणघेवाणीत 10 हजार प्रकरणं समोर आलीयत. आयटी कायद्याच्या कलम 217नुसार यावर दंड बसू शकतो. प्राॅपर्टी रजिस्ट्रेशनमध्ये 20 हजाराहून जास्त पैशांच्या देवाणघेवाणीवर बंदी आहे. दिल्लीत जवळजवळ 2 हजार आणि हैदराबादमध्ये 1700 केसेस समोर आल्यात.
तुम्ही 20 हजारांपेक्षा जास्त कॅश ट्रॅन्झॅक्शन केलंत तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्यावर जास्त दंड लावू शकतं. या कायद्यानुसार 20 हजारांपेक्षा जास्त कॅश ट्रॅन्झॅक्शन झालं तर तेवढ्या रकमेचा दंड पडू शकतो.
पैशांच्या देवाण घेवाणीवरचे नियम कडक
आयकर खातं वेळोवेळी सर्वसामान्यांना जागरुक करतं. इन्कम टॅक्स खात्यानं सांगितलंय की तुम्ही घर खरेदी करताना 20 हजाराहून जास्त देवाण घेवाण करू शकत नाही. याबद्दलचे नियमही प्रसिद्ध केलेत. त्या नियमांचं पालन तुम्ही नाही केलंत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही दोषी सिद्ध झालात तर आयकर विभाग तुमच्याकडून मोठा दंड वसूल करू शकतं.
काय आहे नियम?
20 हजार रुपयांपेक्षा जास्त पैशांची देवाणघेवाण केली तर आयकर खात्याच्या नियमांचं पालन करावं लागेल. पैशात कर्ज देणं, अॅडव्हान्स देणं, डिपाॅझिट घेणं-देणं बेकायदेशीर आहे.
VIDEO: पंतप्रधान मोदींबाबत काय बोलले नारायण राणे?