SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्याचा नियम बदलला

ज्या खातेदारांचं SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्यांच्यासाठी बँकेनं आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. SBI च्या सेव्हिंग अकाउंट्सबद्दल चुकीची बातमी पसरवली जातेय, असंही बँकेनं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 03:27 PM IST

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्याचा नियम बदलला

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : SBI चं ATM कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता या बँकेचे खातेदार महिन्यातून 3 वेळा आपल्या खात्यात निशुल्क पैसे भरू शकतात. त्याचबरोबर बँकेच्या शाखेत जाऊन 2 वेळा पैसे काढू शकतात. SBI ने 1 ऑक्टोबरपासून सर्व्हिस चार्जमध्ये बदल केला आहे. याबदद्लची सगळी माहिती या बँकेच्या वेबसाइटवरही देण्यात आली आहे.

ज्या खातेदारांचं SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे त्यांच्यासाठी बँकेनं आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. SBI च्या सेव्हिंग अकाउंट्सबद्दल चुकीची बातमी पसरवली जातेय, असंही बँकेनं म्हटलं आहे.

(हेही वाचा : खूशखबर! सरकार इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता)

या बँकेच्या खात्यात पैसे भरायचे असतील किंवा काढायचे असतील तर त्यासाठी काही सवलत देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर नंतर ग्राहक महिन्यातून 3 वेळा मोफत पैसे जमा करू शकतात. म्हणजे वर्षातून 36 वेळा पैसे जमा करण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही.

या खात्यातून पैसे काढायचे असतील तर महिन्यातून 2 वेळा मोफत काढण्यात येतील. म्हणजे वर्षातून 24 वेळा मोफत पैसे काढता येतील.

Loading...

SBI च्या ATM मधून महिन्यातून 5 वेळा विनाशुल्क पैसे काढता येतील. वर्षातून 60 वेळा हे पैसे काढता येतील, असं बँकेने म्हटलं आहे. ही सुविधा मेट्रो शहरांमध्ये तसंच इतर सेंटर्समध्येही देण्यात आली आहे.

====================================================================================

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...