Paytm यूजर्सला मोठा झटका! बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

Paytm यूजर्सला मोठा झटका! बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

अलीकडेच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने बचत खात्यातील ठेवीवरील व्याज दर कमी केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : जर तुम्ही Paytm वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण Paytmने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पेटीएमने सेव्हिंग खात्यावरील व्याज कमी केलं आहे. पेटीएम वापरणाऱ्या बँकेने बचत खात्यावरील व्याज दर अर्ध्या टक्क्याने कमी करून 3.5 टक्के केला आहे. पेटीएम बँके (Paytm Bank)ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही घट 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. याबरोबरच पेटीएम पेमेंट बँके (Paytm Payment Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (एफडी) देखील जाहीर केली आहे.

SBI ने बचत खात्यावरील व्याजही केलं कमी

अलीकडेच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने बचत खात्यातील ठेवीवरील व्याज दर कमी केलं आहे. बचत खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्यांना एसबीआय 3.25 टक्के व्याज देणार आहे.

बचत खात्यात 1 लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्यांना एसबीआय 3.25 टक्के व्याज देईल. आता पेटीएम पेमेंट बँकेने (पीपीबी) देखील आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ज्याचे पेटीएम पेमेंट बँकेत बचत खाते आहे अशा ग्राहकांवर याचा परिणाम होणार आहे.

इतर बातम्या - रशियन तरुणीवर मुंबईतील पोलिसाकडून 12 वर्ष बलात्कार, वारंवार केला गर्भपात

पेटीएम एफडीवर देते 7.5 टक्के व्याज

बँकेचे एमडी सतीशकुमार गुप्ता यांनी याविषयी माहिती देताना म्हटलं की, रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर चतुर्थांश टक्क्याने घसरून 5.15 टक्के केला आहे. गेल्या 12 महिन्यांत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 1.35 टक्के कपात केली. यामुळे, हे पाऊल उचललं गेलं आहे. याशिवाय पेटीएम ग्राहकांना एक रुपयात एफडी खाते उघडण्याची संधीही देण्यात आली आहे. पेटीएम एफडीवर 7.5 टक्के व्याज देतं. पेटीएममध्ये बनवलेल्या एफडीमधून कोणतीही शुल्क न घेता अर्धवट किंवा पूर्ण रक्कम काढता येऊ शकते.

इतर बातम्या - निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading