मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर! पगारवाढ करण्याच्या तयारीत सरकार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर! पगारवाढ करण्याच्या तयारीत सरकार

सरकारने याचवर्षी एप्रिलमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 4% ने वाढवण्याचा निर्णय पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलला होता. कामगार मंत्रालयाने DA साठी कंझ्यूमर प्राइस इंडेक्स वर्ष 2001 वरून 2016 केली होती. 45 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी आहात  (Central Govt. Employees) तर सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात देखील तुम्ही पगारवाढीची अपेक्षा ठेवू शकता. अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था सुधारण्यासाठी सरकारकडून मागणी आणि उपभोग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारचा असा मानस आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे असतील, तर ते अधिक खर्च केले जातील आणि उपभोग वाढेल. कामगार मंत्रालयाने  (Ministry of Labour & Employment) महागाई भत्ता (DA Dearness Allowances)  साठी कंझ्यूमर प्राइस इंडेक्स वर्ष 2001 वरून 2016 केली होती.

कामगार मंत्रालयाने हा बदल करण्यामागचा अर्थ असा आहे की, कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता मोजण्यासाठी सध्याचा Cousumption Pattern आणि महागाई दर लक्षात घेतला जाईल. आधीच्या इंडेक्समध्ये कालानुरुप बदलाची आवश्यकता होती.

नाही वाढणार महागाई भत्ता

गेल्या काही दिवसांपासून हेल्थकेअर, घरखर्च ते अगदी इंधनापर्यंत खर्चात वाढ झाली आहे. नवीन इंडेक्समध्ये हे खर्च लक्षात घेतले जातील. जेणेकरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल. मात्र सरकार महागाई भत्ता वाढवणार नाही आहे.

(हे वाचा-दसरा-दिवाळीआधी SBI ने बदलला ATM मधून पैसे काढण्याचा नियम, वाचा सविस्तर)

सध्या 17 टक्के आहे महागाई भत्ता

यावर्षी मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. एप्रिलमध्ये कोरोना व्हायरसचा हवाला देत हा महागाई भत्ता जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आहे. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या महागाई भत्ता वाढवण्याचा कोणताही विचार नाही आहे.

(हे वाचा-बँक खात्यात पैसे नसतील तरीही करता येईल UPI पेमेंट, वाचा काय आहे ही प्रक्रिया)

वाढू शकतो कर्मचाऱ्यांचा पगार

नवीन प्राइम इंडेक्सचा प्रभाव पुढील वर्षाच्या मध्यापासून दिसण्यास सुरुवात होईल. याचा फायदा थेट 45 लाख कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली नाही तरीही प्राइम इंडेक्समधील छोट्याशा बदलावामुळे देखील पगार वाढण्याची आशा वाढली आहे.

First published:

Tags: Money