भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण

भारताची अर्थव्यवस्था संकटात असताना आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. देशात 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 06:34 PM IST

भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारताची अर्थव्यवस्था संकटात असताना आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. देशात 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झाली आहे. कोळसा, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण कारखान्यांची उत्पादनं, खतं, पोलाद, सिमेंट आणि वीजपुरवठा या क्षेत्रांतल्या उद्योगांची घसरण झालीय.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही घसरण मोठी आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या उद्योगांची 4.7 टक्के वाढ होती. आता मात्र ही वाढ उणे 0.5 टक्के आहे.

ही आकडेवारी सरकारनेच जाहीर केली आहे. कोळशामध्ये 8.6 टक्के, कच्चं तेल 5.4 टक्के, नैसर्गिक वायू 3.9 टक्के, सिमेंट 4.9 टक्के आणि वीजपुरवठा 2.9 टक्के एवढी नकारात्मक वाढ झाली.

असं असलं तरी खतं आणि पोलादाचं उत्पादन मात्र 2.9 टक्के आणि 5 टक्क्यांनी वाढलं आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. तरीही कार उद्योगासारखे मोठे उद्योग संकटात आहेत. भारतीय वाहन उद्योगाला सलग दहाव्या महिन्यात तोटा सहन करावा लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी 30 टक्क्यांनी घटली आहे.

(हेही वाचा : रघुराम राजन यांनी टोचले मोदी सरकारचे कान, टीका ऐकून न घेतल्याने मोठ्या चुका)

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 2,82,809 एवढी वाहनं विकली गेली. तोच आकडा या ऑगस्टमध्ये 1,95,558 वर आला आहे.  रिअल इस्टेट क्षेत्रातही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच 8 क्षेत्रांतल्या उद्योगांच्या घसरणीची ही आकडेवारी चिंताजनक आहे.

================================================================

VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...