Paytm वापरणाऱ्यांना झटका, या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

तुम्ही Paytm वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Paytm ने बचत खात्यावर मिळणारं व्याज कमी केलं आहे. या व्याजदरात 3.5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही कपात 1 नोव्हेंबरपासून लागू होईल.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 06:06 PM IST

Paytm वापरणाऱ्यांना झटका, या निर्णयामुळे ग्राहकांचं होणार नुकसान

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : तुम्ही Paytm वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Paytm ने बचत खात्यावर मिळणारं व्याज कमी केलं आहे. या व्याजदरात 3.5 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही कपात 1 नोव्हेंबरपासून लागू होईल.

त्याचबरोबर Paytm Payment Bank ने ग्राहाकांसाठी एफडीची घोषणाही केली आहे.

SBI नेही कमी केलं व्याज

देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI नेही बचत खात्यावरचं व्याज कमी केलं आहे. ही बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जमा करणाऱ्यांना 3. 25 टक्क्यांच्या हिशोबानुसारच व्याज देईल.

Paytm एफडीवर देतं हे व्याज

Loading...

Paytm बँकेचे एमडी सतीशकुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करून हा दर 5. 15 टक्के केला आहे. Paytm एफडीवर 7.5 टक्के व्याज देतं.

(हेही वाचा : सोनं आणि चांदीला पुन्हा झळाळी, हे आहेत आजचे दर)

1 रुपयात सोन्याची खरेदी

ई वाॅलेट पेटिएमनं सोन्याची सेवा सुरू केलीय. यात तुम्ही 1 रुपयांमध्ये सोनं खरेदी करू शकता. तुम्ही 1 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत सोनं खरेदी करू शकता. हे विक्रीला असलेलं सोनं 24 कॅरेट 999.9 शुद्ध असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तुम्ही या सोन्याची खरेदी केलीत की ते लाॅकरमध्ये ठेवलं जातं. मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही घरी सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकता.

==============================================================================

माईंड इट...,मोदींचा खास दाक्षिणात्य लूक, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneyPaytm
First Published: Oct 11, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...