3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

Jobs, Job Opportunity - पुढच्या सहा महिन्यात नोकरीची मोठी संधी उपलब्ध असणार आहे, असं एका सर्वेत आढळून आलंय

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 12:21 PM IST

3 ते 5 वर्षाचा नोकरीचा अनुभव आहे? मग पुढच्या 6 महिन्यांत अशी मिळेल मोठी संधी

मुंबई, 26 जुलै : तुमच्याकडे 3 ते 5 वर्षांचा नोकरीचा अनुभव असेल तर मग निश्चिंत राहा. पुढच्या 6 महिन्यांत तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी नक्की मिळणार. या वर्षात दुसऱ्या सहा महिन्यांत कंपनीज् नव्या नियुक्त्या करण्याचे प्लॅन्स करतायत. ज्या लोकांकडे 3 ते 5 वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही नोकरी असेल. एका सर्वेमध्ये हे समोर आलंय.

जाॅब साइट naukari.com नं आपल्या सर्वेत म्हटलंय की, या सर्वेमध्ये ज्या कंपन्यांचा समावेश आहे, त्यातल्या 78 टक्के कंपन्या पुढच्या सहा महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 70 टक्के होता. रोजगाराच्या संधी वाढतायत पण या कंपन्यांनी सांगितलं की कौशल्य, बुद्धिमत्ता याची कमतरता जाणवतेय. त्यामुळे योग्य उमेदवार मिळायला अडचणी येतायत. या सर्वेत सांगितलंय की सहा महिन्यात टॅलेंटची कमतरता जाणवेल. एक वर्षांपूर्वी 50 टक्के कंपन्यांनी हीच शंका व्यक्त केली होती.

खूशखबर, आज पेट्रोल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

या लोकांना मिळेल संधी

या सर्वेप्रमाणे सर्वात जास्त नोकरीची संधी 3 ते 5 वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना मिळणार. त्यानंतर 1 ते 3 वर्षाचा अनुभव असलेल्यांना संधी आहे. एकूण हायरिंगच्या जवळजवळ 18 टक्के 8 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या उमेदवारांना मिळणार. बीपीओ सेक्टरमधल्या कंपनी 0 ते 1 वर्षापर्यंत अनुभव असलेल्या उमेदवारांना 50 टक्के संधी देतील. तर ऑटोमोबाइल इंडस्ट्री 12 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्यांना नोकरी देईल.

Loading...

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

IT, BFSI आणि BPO इथे 80-85 टक्के नव्या नोकऱ्या तयार होतील

16 टक्के कंपन्यांचं म्हणणं आहे की, पुढच्या सहा महिन्यांत फक्त रिप्लेसमेंट हायरिंग होईल. 5 टक्के लोकांचं म्हणणं आहे की हायरिंगमध्ये फार वाढ होणार नाही. आयटी, बीएफएसआय आणि बीपीओ क्षेत्रातल्या 80-85 टक्के कंपन्या नव्या नोकऱ्या निर्माण व्हायचे संकेत देतायत.

खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

नोकरी बदलायची कारणं

चांगला पगार, चांगलं प्रोफाइल, करियरसाठी पोषक ही कारणं नोकरी बदलताना असतात. काही कर्मचारी ऑफिसचं ठिकाण आणि मॅनेजरमुळे दुसरी नोकरी पकडतात. या सर्वेमध्ये 15पेक्षा जास्त मोठ्या इंडस्ट्रीजच्या जवळजवळ 2700 कंपनीज आणि कन्सल्टंट यांचा समावेश होता.

VIDEO: पुण्यातील धनकवडी परिसरात इमारतीची भिंत कोसळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 26, 2019 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...