Home /News /money /

अनेक IPO मुळे गेल्यावर्षी बंपर कमाई, मात्र यावर्षी यातील 16 कंपन्यामुळे मोठं नुकसान

अनेक IPO मुळे गेल्यावर्षी बंपर कमाई, मात्र यावर्षी यातील 16 कंपन्यामुळे मोठं नुकसान

जानेवारीमध्ये BSE IPO निर्देशांक 10 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. IPO मधील सर्वात मोठ्या घसरणीमध्ये Zomato, Paytm, Nykaa, CarTrade सारख्या दिग्गजांचा समावेश आहे, ज्यावर गुंतवणूकदारांना मोठा विश्वास होता.

    मुंबई, 25 जानेवारी : मागील वर्षात शेअर बाजार IPOs मुळे चर्चेत राहिला. गेल्या वर्षी बाजारात आलेल्या IPO मुळे बरेच गुंतवणूकदार आकर्षित झाले आणि यामुळे त्यांना भरपूर नफाही मिळाला आहे. मार्केटमध्ये लिस्टिंगच्या वेळीही त्यांच्या किमती खूप वाढल्या होत्या, पण जानेवारी महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणीने जवळपास 38 टक्के IPO सपाट झाले. Bloomberg च्या मते, 2021 मध्ये 42 कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. यापैकी 38 टक्के म्हणजेच जवळपास 16 कंपन्यांचे शेअर्स आता त्यांच्या इश्यू किमतीच्या खाली पोहोचले आहेत. परिस्थिती अशी आहे की दर तीनपैकी एक आयपीओ विक्री किंमतीपेक्षा कमी दराने व्यवहार करत आहे. मार्च 2020 नंतर, भारतीय IPO बाजाराला या महिन्यात सर्वात जास्त संकटाचा सामना करावा लागला आहे. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी जानेवारीमध्ये BSE IPO निर्देशांक 10 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. IPO मधील सर्वात मोठ्या घसरणीमध्ये Zomato, Paytm, Nykaa, CarTrade सारख्या दिग्गजांचा समावेश आहे, ज्यावर गुंतवणूकदारांना मोठा विश्वास होता. ज्या कंपन्यांनी IPO मधून 3.5 हजार कोटींहून अधिक निधी उभारला आहे त्यापैकी 46 टक्के कंपन्यांना आता तोट्याचा सामना करावा लागत आहे. Google मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी! पुण्यात उघडणार ऑफिस, जाणून घ्या तुम्हाला काय करायचं? रेकॉर्डब्रेक फंडची उभारणी BSE आणि NSE वर लिस्टिंग होण्यापूर्वी, या कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ आणि अँकर गुंतवणूकदारांकडून 18 बिलियन डॉलर पेक्षा जास्त रक्कम उभारली होती, जी भारतीय शेअर बाजारात आजपर्यंतचा विक्रम आहे. सोमवारी दोन महिन्यांतील सर्वात मोठ्या घसरणीदरम्यान झोमॅटोचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे Nykaa 13 टक्क्यांनी आणि Paytm 4 टक्क्यांनी घसरला. 2021 मध्ये सर्वात मोठा IPO आणणाऱ्या Paytm च्या शेअरची किंमत त्याच्या उच्चांकावरून 50 टक्क्यांहून अधिक खाली आली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या