Home /News /money /

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटींचं नुकसान

सेन्सेक्स 1545.67 अंकांनी किंवा 2.62 टक्क्यांच्या घसरणीसह 57,491.51 वर बंद झाला, तर निफ्टी 468.05 अंकांनी किंवा 2.66 टक्क्यांच्या घसरणीसह 17,149.10 वर बंद झाला.

    मुंबई, 24 जानेवारी : शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी जोरदार घसरणीसह बंद झाला आहे. सलग चार सत्रांतील घसरणीचा फटका बसल्यानंतर सोमवारपासून शेअर बाजाराला मोठ्या आशा होत्या, मात्र गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने बाजारात खळबळ उडाली होती. आजच्या सत्रानंतर जिथे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 57,500 च्या खाली गेला, निफ्टीही अखेर 17,149 च्या पातळीवर बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान, सोमवारी देखील आठवड्याच्या पहिल्या दिवशी, BSE आणि NSE दोन्ही निर्देशांक घसरणीसह खुले झाले होते. आज सेन्सेक्स 1545.67 अंकांनी किंवा 2.62 टक्क्यांच्या घसरणीसह 57,491.51 वर बंद झाला, तर निफ्टी 468.05 अंकांनी किंवा 2.66 टक्क्यांच्या घसरणीसह 17,149.10 वर बंद झाला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्सनी घसरण नोंदवली. Paytm, Zomato शेअर्समध्ये मोठी घसरण, लिस्टिंगनंतरच्या नीच्चांकी पातळीवर, काय आहे कारण? गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान या 5 दिवसांच्या जोरदार विक्रीमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 17.54 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 17 जानेवारीपासून निफ्टी 1,100 अंकांनी किंवा 5.4 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी सेन्सेक्स 3,300 हून अधिक अंकांनी तुटला आहे. शेअर बाजारातील पडझडीदरम्यान टॉप पिक्स, या शेअर्समध्ये 3-4 आठवड्यात चांगल्या कमाईची संधी TATA Steel च्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण आज प्रत्येक क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात रियल्टी, मेटल, आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये आज 5.58 टक्क्यांची घसरण झाली आहे. यासह हा स्टॉक 1099.15 रुपयांवर आला. याशिवाय बजाज फायनान्स, विप्रो, टेक महिंद्रा, टायटन, रिलायन्स, एचसीएल टेक, कोटक बँक इत्यादी शेअरमध्येही मोठी घसरण झाली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या