मराठी बातम्या /बातम्या /मनी /

टाटांच्या एअर इंडियाला मोठा झटका! प्रवाशांना रिफंडच्या रूपात द्यावे लागणार तब्बल 10 अब्ज रूपये

टाटांच्या एअर इंडियाला मोठा झटका! प्रवाशांना रिफंडच्या रूपात द्यावे लागणार तब्बल 10 अब्ज रूपये

टाटांच्या एअर इंडियाला मोठा झटका! प्रवाशांना रिफंडच्या रूपात द्यावे लागणार तब्बल 10 अब्ज रूपये

टाटांच्या एअर इंडियाला मोठा झटका! प्रवाशांना रिफंडच्या रूपात द्यावे लागणार तब्बल 10 अब्ज रूपये

टाटा समूहाच्या एअर इंडियाला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. एअर इंडियाला प्रवाशांना परतावा म्हणून तब्बल 10,00,90,96,614 रुपये (121.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 अब्ज रुपये) द्यावे लागतील. यासोबतच कंपनीला 113,353,804 (1.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 कोटी रुपये) कोटी रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 15 नोव्हेंबर: टाटा समूहाच्या एअर इंडियाला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. एअर इंडियाला प्रवाशांना परतावा म्हणून तब्बल 10,00,90,96,614 रुपये (121.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 अब्ज रुपये) द्यावे लागतील. यासोबतच कंपनीला 113,353,804 (1.4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 कोटी रुपये) कोटी रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. एअर इंडियाचं नाव त्या 6 एअरलाइन कंपन्यांच्या यादीत समाविष्ट आहे, ज्यांना अमेरिकन प्रवाशांना 60 कोटी डॉलर रिफंड द्यावा लागणार आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त फ्रंटियर, TAP पोर्तुगाल, एरो मेक्सिको, EI AI आणि Avianca यांचाही या यादीत समावेश आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, यूएस परिवहन विभागानं विमान कंपन्यांना विमान रद्द झाल्यामुळं किंवा वेळापत्रकात बदल झाल्यामुळं हा रिफंड देण्यास सांगितलं आहे. सर्वाधिक रिफंडची प्रकरणं कोरोना महामारीच्या काळात आहेत. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की विमान रद्द झाल्यास प्रवाशांच्या विनंतीनुसार रिफंड देण्याबाबत एअर इंडियाचं धोरण अमेरिकेच्या परिवहन विभागाच्या नियमांपेक्षा वेगळं आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनच्या नियमांनुसार फ्लाइट रद्द झाल्यास किंवा फ्लाइट बदलल्यास विमान कंपन्यांना तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत करावे लागतात. ज्या प्रकरणांमध्ये एअर इंडियाला आता रिफंड आणि दंड भरावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे ही सर्व प्रकरणं टाटा यांनी एअर इंडिया ताब्यात घेण्यापूर्वीची आहेत.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल GSTच्या कक्षेत येणार? केंद्र सरकार तयार, राज्यांच्या भू्मिकेकडे लक्ष

परिवहन विभागाकडे 1 हजार 900 तक्रारी पोहोचल्या-

एअर इंडियाच्या विरोधात सुमारे 1,900 परतावा प्रकरणं यूएस परिवहन विभागाकडे दाखल करण्यात आली होती. एअर इंडियाला यापैकी केवळ अर्ध्या प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी 100 पेक्षा जास्त दिवस लागले. प्रवाशांना परतावा देण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेबाबत एअर इंडिया या विभागाला कोणतंही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. प्रवाशांनी यापूर्वी थेट एअर इंडियाकडूनच रिफंडची विनंती केली होती. परतावा न मिळाल्यानं परिवहन विभागाकडे तक्रार करण्यात आली. एअर इंडियाने रिफंड पॉलिसी असतानाही एअर इंडियानं प्रवाशांना तिकिटाचे पैसे वेळेवर परत केले नसल्याचं परिवहन विभागानं सांगितलं. परिणामी, परतावा मिळण्यास विलंब होत असल्यानं ग्राहकांचं नुकसान झालं आहे.

तिकिटाचे पैसे परत करणं बंधनकारक-

अमेरिकेच्या कायद्यानुसार, एअरलाइन्स आणि तिकीट एजंट्सना अमेरिकेत चालणाऱ्या किंवा तिथून उड्डाण घेणाऱ्या फ्लाइटच्या रद्द किंवा बदलासाठी प्रवाशांना पैसे परत करण्याचं बंधन आहे. एअरलाइननं रिफंड न केल्यास किंवा रिफंडऐवजी व्हाउचर दिल्यास तो गुन्हा मानला जातो.

First published:

Tags: Ratan tata