आता इंटरनेटशिवाय BHIM App च्या मदतीनं करा पैसे ट्रान्सफर, 'हे' आहेत फीचर्स

आता इंटरनेटशिवाय BHIM App च्या मदतीनं करा पैसे ट्रान्सफर, 'हे' आहेत फीचर्स

आता बदलत्या जमान्यात स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय फंड ट्रान्सफर करता येतो.

  • Share this:

मुंबई, 18 मे : NPCI नं BHIM अ‍ॅपच्या लेटेस्ट वर्जननध्ये वन टाइम मेंडेट फीचर जोडलंय. या फीचरमुळे युजर्स त्यांचं पेमेंट नंतर कुठल्याही डेटवर श्येड्युल करू शकतात. समजा तुम्हाला महिन्याच्या 15 तारखेला घराचं भाडं द्यायचं असेल तर तुम्ही कधीही त्या तारखेचं श्येड्युल लावू शकता. म्हणजे पैसे तुमच्या अकाउंटमध्येच राहतील. पण पेमेंट होईपर्यंत ते ब्लाॅक राहतील. चांगली गोष्ट म्हणजे त्यावर व्याज मिळणं बंद होणार नाही. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी भीम अ‍ॅप लाँच केलं होतं.

जाणून घेऊ याच्या खास फीचर्सबद्दल

मोबाइल फोनवरून फंड ट्रान्सफर करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे, असा नेहमी विचार केला जातो. पण आता बदलत्या जमान्यात स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय फंड ट्रान्सफर करता येतो.

'या' 5 गोष्टींमुळे तुमच्या बचतीत होईल वाढ

BHIM App च्या मदतीनं हे सोप्या पद्धतीनं करता येतं. बँक अकाउंटला लिंक असलेल्या मोबाइल फोनच्या मदतीनं असं करणं सहज शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला USSDवर आधारित मोबाइल बँकिंगचा वापर करावा लागेल.

आता BHIM App बरोबर USSD प्लॅटफाॅर्मलाही अपग्रेड केलंय. यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन आणि त्यावर भीम अ‍ॅप डाउनलोड करायला हवं.

3 ते 4 लाखांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

याशिवाय तुम्हाला भीम अ‍ॅपवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायला हवी. एकदा का सिम कार्ड आणि स्मार्टफोन तुमच्या बँक अकाउंटशी जोडले गेले की फंड ट्रान्सफर करणं अवघड नाही.

तुमच्याकडे इंटरनेट असेल तर UPI वर आधारित असलेलं ट्रान्झॅक्शन करायला हवं. इंटरनेट उपलब्ध नसेल तर USSD आधार मोबाइल बँकिंगचा पर्याय निवडावा लागेल.

ऑफिसमधली उद्धट वागणूक असते संसर्गजन्य? काय सांगतोय हा रिसर्च?

यासाठी तुम्हाला *99# डायल करायला हवं. तुमच्या स्क्रीनवर वेलकम स्क्रीन येईल. त्यावर सात पर्याय येतील. Send money, Request money, Check balance, My profile, Pending requests, Transactions आणि UPI PIN.

Send money सिलेक्ट करून मोबाइल नंबर, पेमेंट अॅड्रेस, सेव्हड बेनिफिशियरी किंवा IFSC कोड आणि अकाउंट नंबराच्या मदतीनं पैसे ट्रान्सफर करू शकता.

कधी कधी गावांत दूरगामी भागांत इंटरनेट कनेक्शन मिळत नाही. अशा वेळी भीम अ‍ॅपचं हे फीचर खूप उपयोगी आहे. यामुळे फंड ट्रान्सफर करणं सोपं जातं.

मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं मार्मिक ट्विट, महत्त्वाच्या 18 घडोमोडींचा वेगवान आढावा

First published: May 18, 2019, 4:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या