Home /News /money /

नव्या वर्षात SBI ची नवी सेवा! कार्ड नसेल तरी करता येणार पेमेंट

नव्या वर्षात SBI ची नवी सेवा! कार्ड नसेल तरी करता येणार पेमेंट

एसबीआयने नव्या वर्षीत नवीन पेमेंट मोड ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये तुम्हाला पेमेंट कऱण्यासाठी तुम्हाला कॅश किंवा कार्डची गरज नाही

    नवी दिल्ली, 03 डिसेंबर : देशातील सर्वात मोठी बँक असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नव्या वर्षात ग्राहकांसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. एसबीआयने नव्या वर्षीत नवीन पेमेंट मोड ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये तुम्हाला पेमेंट कऱण्यासाठी तुम्हाला कॅश किंवा कार्डची गरज नाही तर तुमच्या अंगठ्याची मदत होणार आहे. बँकेने BHIM Aadhaar SBI सुरू केलं आहे. भीम आधारच्या मदतीने फक्त आधार नंबरवरून पेमेंट करता येणार आहे. एसबीआय़ने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. दुकानदाराला यासाठी अॅपवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यामध्ये नाव, पत्ता, फोन नंबर, आधार क्रमांक आणि व्यापाराच्या माहितीसह बँक खाते ज्यात इतरांना पैसे पाठवता येतील ते निवडावे लागेल. या खात्याला आधार लिंकिंग असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दुकानदाराला ग्राहकाचे फिंगप्रिंट घेण्यासाठी STQC सर्टिफाइड FP स्कॅनर घ्यावा लागेल. हा स्कॅनर अँड्रॉइड मोबाईलला कनेक्ट करावा लागेल. ग्राहकाने खरेदी केल्यानंतर त्याच्या बँकेचं नाव निवडायचं. त्यानंतर आधार नंबर, रक्कम दुकानदाराच्या मोबाईलमध्ये एंटर करायची. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅन करून पेमेंट करता येते. त्यानंतर पेमेंट थेट दुकानदाराच्या खात्यावर ट्रान्सफर होईल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचा मेसेजही मिळतो. RuPay कार्डवर 16 हजार रुपये कॅशबॅक मिळवण्याची संधी, यासाठी फक्त करा हे काम गुगल प्ले स्टोअरवर BHIM-Aadhaar-SBI अॅप उपलब्ध आहे. सध्या  OS v 4.2-Jelly Bean आणि त्यानंतरच्या सर्व ओटीजी सपोर्ट करणाऱ्या मोबाईलवर याचा वापर करता येतो. हे अॅप फक्त दुकानदार, व्यापारी यांनाच इन्स्टॉल करावं लागेल. ग्राहकांना अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाली 8 गिफ्ट्स, वाचणार पैसे, बदलेल तुमचं आयुष्य  
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: SBI

    पुढील बातम्या