BHEL मध्ये 2.8 लाख पगारापर्यंतच्या 24 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

Bharat Heavy Electricals limited (BHEL)मध्ये इंजीनियर्स आणि मॅनेजमेंट 24 पदांसाठी व्हेकन्सीज् आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:37 PM IST

BHEL मध्ये 2.8 लाख पगारापर्यंतच्या 24 व्हेकन्सीज्, 'असा' करा अर्ज

मुंबई, 07 जून : Bharat Heavy Electricals limited (BHEL)मध्ये  इंजीनियर्स आणि मॅनेजमेंट 24 पदांसाठी व्हेकन्सी आहे. BHEL च्या वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध झालंय. सीनियर पदांसाठी सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

या पदांसाठी आॅनलाइन अर्ज करावे लागतील. अर्जाची शेवटची तारीख आहे 25 जून 2019. इंजीनियर आणि मॅनेजर पदांसाठी 24 जागा आहेत. आॅनलाइन अॅप्लिकेशन प्रक्रिया 10 जून 2019ला सुरू होईल. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 25 जून 2019.

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं गर्लफ्रेंडसाठी घेतलं 552 कोटींचं घर, पाहा VIDEO

मोदींच्या कार्यकाळात RBI नं केले मोठे बदल, आता वाचतील तुमचे पैसे

या पदांसाठी अनुभवी उमेदवार हवेत. फ्रेशर्सनी अर्ज करू नये. प्रत्येक पदासाठी वेगवेगळा कामाचा अनुभव हवाय. निवडलेल्या उमेदवाराला 1 वर्ष प्रोबेशन पीरियडवर राहावं लागेल.

Loading...

पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना

पद आणि पगार

सीनियर इंजीनियर- E2- (70,000-2,00,000)

डेप्युटी मॅनेजर- E3- (80,000-2,20,000)

मॅनेजर- E4- (90,000-2,40,000)

सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर- E6A- (1,20,000-2,80,000)

उमेदवाराची निवड पर्सनल इंटरव्ह्यूनं होईल.

कसा कराल अर्ज?

 www.bhel.com/bhel-landing/ या लिंकवर जा. होमपेजवर Current Job Openings क्लिक करा. आता RECRUITMENT- Experienced Engineering Professionals -2019 वर क्लिक करा. ही लिंक 10 जूनपासून अॅक्टिव्ह होईल.


VIDEO : आयारामांची आमच्याकडे लाईन, गिरीश महाजनांचा चव्हाणांवर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...