Bharat Bond ETF : मोदी सरकारने सुरू केली आणखी एक फायदेशीर योजना

Bharat Bond ETF : मोदी सरकारने सुरू केली आणखी एक फायदेशीर योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॅबिनेटने भारत बाँड इटीएफ (Bharat Bond ETF)ला मंजुरी दिलीय. हा देशातला पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॅबिनेटने भारत बाँड इटीएफ (Bharat Bond ETF)ला मंजुरी दिलीय. हा देशातला पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबदद्लची घोषणा केली आहे. यामध्ये 3 वर्षं आणि 10 वर्षं अशा दोन स्वरूपाच्या योजना असतील. याचा अर्थ एक योजना 2023 मध्ये मॅच्युअर होईल तर दुसरी 2030 मध्ये.

Bharat Bond ETF मध्ये सुमारे एक डझन सरकारी कंपन्यांचे शेअर्स असतील. ज्या कंपन्या यात सहभागी होतील त्यात हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन, नाबार्ड, एक्झिम बँक, न्यूक्लिअर पॉवर, आसी पॉवरग्रिड या कंपन्यांचे शेअर्स असतील. या एक डझन कंपन्यांमध्ये 1 हजार युनिट साइज असेल आणि त्या माध्यमातून पैसे जमा केले जातील.

लवकरच होणार सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Bharat Bond ETF या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. घाऊक गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राचं लक्ष वेधण्याचा उद्देश यामागे आहे.

(हेही वाचा : नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, हे डॉक्युमेंट्स दिले नाहीत तर कापला जाणार पगार)

Bharat Bond ETF ची वैशिष्ट्यं

1. यामध्ये CPSE,CPSU, CPFI किंवा कोणत्याही सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करता येते.

2. एक्सेंजवर बाँडमध्ये ट्रेडिंग होऊ शकतं.

3. कमीतकमी युनिट साइज 1 हजार रुपयांचं आहे.

4. ट्रान्सपरंट NAV

(हेही वाचा : 2 हजार रुपयांच्या नोटा बंद होणार का? मोदी सरकारने दिलं हे उत्तर)

5. ट्रान्सपरंट पोर्टफोलिओ (वेबसाइटवर रोज आढावा)

6. प्रत्येक ETF ची ठराविक मॅच्युरिटी तारीख असेल.

7. सध्या याचा मॅच्युरिटीचा कालावधी 3 ते 10 वर्षं आहे.

===============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 4, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading